ध्यान रहे की आप मेहनत करते हो तो आपको संसाधन जैसे घर.गाड़ी,शिक्षा,दवाई आदि मिलते हैं पर अगर आपका समाज संगठित होकर मेहनत करता है तो आपकी मेहनत की सुरक्षा होती है और आपसे आपकी कमाई कोई नहीं छीन सकता कोई आपपर जुलम नहीं कर सकता| हम कितना ऊपर पहुचेंगे ये इस बात पर तय होती है की हमारा समाज कितना सशक्त है| आप खुद परखें आप अपने समाज के और सवर्णों के दसवी फेल की दशा आज देखो और फिर ५ साल बाद देखना , बहुत फर्क मिलेगा| कोई देवी देवता कोई धर्म हमारा भला नहीं कर सकता, अगर कर सकते तो दो हज़ार सालों तक हर जुल्म की आह में हमारे समाज ने इन्हीं देवी देवता और भगवानों को पुकारा पर डॉ आंबेडकर के आने तक कुछ न हुआ, जुल्म बदस्तूर चालू रहे|डॉ आंबेडकर सूत्र “शिक्षित बनो, संगठित रहो, संगर्ष करो” ही है जिससे हमारा भला हो पाया है और होता रहेगा|
Sunday, March 22, 2015
मी संपूर्ण आयुष्यात कधीही प्रार्थना केली नाही
विद्यार्थी व तरूणांचे प्रेरणा स्थान क्रांतीविर भगतसिंग यांच्या बलीदान दिनानिमीत्त (23 मार्च 1931) त्यांच्या स्मृतीस विनम्र अभीवादन...!
आजच्या दिवशी म्हणजे दिनांक 23 मार्च,१९३१ रोजी स्वातंत्र्यवीर भगतसिंग (जन्म : सप्टेंबर २७, १९०७ - मृत्यू : मार्च २३, १९३१) लाहोरच्या तुरुंगात हसत हसत फासावर गेले. फाशी जाताना त्यांचे वय अवघे २३ वर्षांचे होते. त्यांना ’शहीद-ए-आलम’ असा किताब दिला जातो. त्यांच्या स्मरणार्थ २३ मार्च हा दिवस, भारतात शहीद दिन म्हणून पाळला जातो. भगतसिंग यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून युवकांनी वर्तन केले पाहिजे.
"ज्यांना वाट चुकलेली पोरे म्हणतात, तीच पोरे क्रांती करतात...." विर भगतसिंग
फाशीवर चढवताना एक सरदार भगतसिगाना म्हणतो.माझ्याजवळ धर्मग्रथ आहे. आता तरी काहीतरी वाच. त्यावर भगतसिंग म्हणाले.
"आज,यावेळी जर मी प्रार्थना केली तर तुमचा देव मला भिञा म्हणेल.मी संपूर्ण आयुष्यात कधीही प्रार्थना केली नाही, ती मी आज केली तर तो म्हणेल की हा भितीपोटी प्रार्थना करतो आहे कारण आजवर मी तसा जगलो आहे.माझ्यावर कुणी असा आरोप करणार नाही की जन्मभर मी नास्तिक राहिलो पण अखेरच्या वेळी भितीपोटी आस्तिक झालो" या देशातील तरूणांनी शहीदे आजम भगतसिंह यांचा आदर्श घ्यावI
Wednesday, March 18, 2015
फूलों की सुगंध हवा के विपरीत नहीं जाती किंतु शील की सुगंध हवा के विपरीत भी जाती है
नमोबुध्दाय जयभीम ।
# तथागत भगवान बुध्द कहते हैं , फूलों की सुगंध हवा के विपरीत नहीं जाती और न ही चंदन की , न चमेली की और न ही तगर की किंतु शील की सुगंध हवा के विपरीत भी जाती है और सब दिशाओं में फैल भी जाती है ।इसलिए मानव को अपने अंदर शील गुण को समाहित करने का प्रयास करते रहना चाहिए जिससे उसके व्यक्तिव की सुगंध चारों ओर फैल जाये ।
# व्यक्ति धन का दान करता है , भोजन का दान करता है वस्तुओं का दान करता है समय कि दान करता है किंतु मानव कल्याण के लिए सबसे उत्तम धम्म दान होता है और धम्मपद का दान तो महादान होता है ।
# तथागत भगवान बुध्द कहते हैं , फूलों की सुगंध हवा के विपरीत नहीं जाती और न ही चंदन की , न चमेली की और न ही तगर की किंतु शील की सुगंध हवा के विपरीत भी जाती है और सब दिशाओं में फैल भी जाती है ।इसलिए मानव को अपने अंदर शील गुण को समाहित करने का प्रयास करते रहना चाहिए जिससे उसके व्यक्तिव की सुगंध चारों ओर फैल जाये ।
# व्यक्ति धन का दान करता है , भोजन का दान करता है वस्तुओं का दान करता है समय कि दान करता है किंतु मानव कल्याण के लिए सबसे उत्तम धम्म दान होता है और धम्मपद का दान तो महादान होता है ।
Sunday, February 22, 2015
शिवाजी कोण होता? - गोविंद पानसरे
हे पुस्तक 1988 साली प्रकाशित झालं होतं. आजवर या पुस्तकाची 37 वेळा आवृत्ती छापाव्या लागल्या होत्या. आतापर्यंत 1.42 लाख प्रतींची विक्री झाली आहे तर आणखी पाच हजार पुस्तकांची मागणी नोंदवली गेली आहे
पानसरे दाम्पत्यावर 16 फेब्रुवारी रोजी कोल्हापुरातच हल्ला झाला होता. मात्र त्यानंतर म्हणजेच 17 फेब्रुवारी या एकाच दिवशी शिवाजी कोण होता? च्या तीन हजार प्रतींची विक्री झाल्याची माहिती लोकवाग्मय प्रकाशनने दिली आहे.
Wednesday, February 18, 2015
Sunday, February 1, 2015
साहेबाचा साहेब बाबासाहेब
विजेसारखी कलम चालवुन गेला,
पेनाच्या टोकाने Bharat हालवुन
गेला !
भारतासाठी संविधान देउन
गेला,
प्रजासत्ताक दिन पवित्र करून गेला !
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन
जय भिम केला,
असा एक
"साहेबाचा साहेब बाबासाहेब"होऊन
गेला."................................................!!
*******************************************************************
पेनाच्या टोकाने Bharat हालवुन
गेला !
भारतासाठी संविधान देउन
गेला,
प्रजासत्ताक दिन पवित्र करून गेला !
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन
जय भिम केला,
असा एक
"साहेबाचा साहेब बाबासाहेब"होऊन
गेला."................................................!!
*******************************************************************
होतं ओसाडलेलं रानं
कसं बहरुन आलयं छानं..
भीमाची करणी बोले ही धरणी
जय भीम सन्मानानं..
अशी कमाल केली रं दादा
भीमाईच्या पोरानं..
कसं बहरुन आलयं छानं..
भीमाची करणी बोले ही धरणी
जय भीम सन्मानानं..
अशी कमाल केली रं दादा
भीमाईच्या पोरानं..
काल शिकायची होती बंदी
दिली भीमानं नामी संधी..
आज शिकायला पोर पोरी
कसे जाती विदेशामंदी..
राहायला माडी फिरायला गाडी
हाती मोबाईल फोन..
अशी कमाल केली रं दादा
भीमाईच्या पोरानं..
दिली भीमानं नामी संधी..
आज शिकायला पोर पोरी
कसे जाती विदेशामंदी..
राहायला माडी फिरायला गाडी
हाती मोबाईल फोन..
अशी कमाल केली रं दादा
भीमाईच्या पोरानं..
काल फाटकचं लुगडं चोळी
माय घालायची रोज रोज..
आज शालू पैठणी नेसून
कशा करती शिंगार साज..
भीमाचं देणं घालुन सोनं
फिरतात आनंदानं..
अशी कमाल केली रं दादा
भीमाईच्या पोरानं..
माय घालायची रोज रोज..
आज शालू पैठणी नेसून
कशा करती शिंगार साज..
भीमाचं देणं घालुन सोनं
फिरतात आनंदानं..
अशी कमाल केली रं दादा
भीमाईच्या पोरानं..
काल लिहुन ठेवलाय कायदा
आज सा-यांना झालाय फायदा..
पाहीन समाज सूटा बूटात
होता भीमानं केलाय वायदा..
असा कुणाचा जगात गौरव
केला का इतिहासानं..
अशी कमाल केली रं दादा
भीमाईच्या पोरानं..
आज सा-यांना झालाय फायदा..
पाहीन समाज सूटा बूटात
होता भीमानं केलाय वायदा..
असा कुणाचा जगात गौरव
केला का इतिहासानं..
अशी कमाल केली रं दादा
भीमाईच्या पोरानं..
Tuesday, January 13, 2015
आंबेडकरांनी शिक्षणाला वाघिणीचेच दुध का म्हटले?
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला वाघिणीचेच दुध का म्हटले?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थ्यांसाठी बोलून गेले की, शिक्षण हे वाघीनीचे दुध आहे, ते प्राशन केल्यानंतर मनुष्य गुरगुरल्याशिवाय राहत नाही. म्हणून ते प्राशन करीत असताना विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपण करु नये, ते मनसोक्त आणि पोटभर प्राशन करावे. म्हणजेच अन्याय अत्याचाराविरुध्द तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला वाघिणीचेच दुध का म्हटले? हे सुध्दा विद्यार्थ्यांनी ध्यानात घेणे गरजेचे आहे. बकरीचे, गाईचे किंवा म्हशीचे दुध पौष्टीक असताना, त्यात चांगली जीवनसत्वे असताना त्यांनी शिक्षणाला वाघिणीच्या दुधाची उपमा का दिली असावी? तर त्याचे मुख्य कारण हे आहे की, वाघिण आपल्या बछड्याला सतत सहा महिने आपल्या अंगावरचे दुध पोटभर पाजते. आईचे दुध पोटभर प्याल्याने ते पिल्लू अवांतर काही खात नाही. इतकेच नव्हे तर आपल्या आईने करुन आणलेली शिकारही ते पिल्लू खात नाही किंवा अन्य वाघांनी करुन आणलेल्या शिकारीलाही तोंड लावत नाही. सहा महिने झाल्यानंतर मात्र वाघिणीचा बछडा प्रत्येक्ष शिकार करतो. इतकी ताकद त्या वाघिणीच्या दुधात असते.
याचा दुसरा अर्थ असा की, वाघिनीचा बछडा शिळी किंवा मेलेली शिकार न खाता नव्या जिवंत शिकारीवर चाल करुन ती खातो. इथे ही गोष्ट विद्यार्थ्यांनी लक्षात घेतली पाहिजे आणि आपल्या शिक्षणातून नविन आणि जिवंत इतिहास घडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून विद्यार्थ्यांनी सामाजिक भान ठेवून शिक्षण करावे आणि डॉ. बाबासाहेबांना अभिप्रेत असे विद्यार्थी बनावे. पण आज त्याच वाघिनीच्या दुधाला इतके निकृष्ट व महाग करुन ठेवले आहे की, अति गरीबाला ते घेणेच दुर्लभ झाले आहे किंवा घेतलच तर वाघ नाही मांजरे तयार होत आहेत तिही ताटा खालची.
धन्यवाद- Dev Bhivsane, भंते अश्वजीत

Subscribe to:
Posts
(
Atom
)