Wednesday, June 24, 2015

प्रसुती - सिजेरिअन योग्य की अयोग्य -



प्रसुती - सिजेरिअन योग्य की अयोग्य -
========================
काळजीपोटी निर्णयाची घाई न केलेलीच बरी!
सिझेरिअन’ हा शब्द आता सर्रास कानावर येतो.
कुणी प्रसूत झाली असं कळलं की, लोक हमखास प्रश्न विचारतात, सिझर की नॉर्मल?
सिझर हेच उत्तर सर्रास कानावर येतं. पुढे पालूपदही जोडलं जातं की, आता तर काय सिझर नॉर्मल झालेत!
पण खरंच हे सिङोरिअन करणं म्हणजे गरोदर स्त्रीच्या पोटावर आणि गर्भाशयावर छेद घेऊन बाळ बाहेर काढण्याची शस्त्रक्रिया इतकी सर्रास करण्यासारखी गोष्ट आहे का?
या शस्त्रक्रियेचा प्रचार साधारण: 6क्-7क् वर्षापूर्वी प्रतिजैविकांचा शोध लागल्यानंतर झाला. आज मात्र इतक्या मोठय़ा प्रमाणात आणि बेजबाबदारपणो ही शस्त्रक्रिया जगभर केली जात आहे.
खरंतर गरोदरपण आणि प्रसूती या स्त्रीच्या आयुष्यात घडणा:या नैसर्गिक घटना आहेत. गरोदरपण आणि प्रसूती हे काही आजार नाहीत. शुक्राणू आणि स्त्रीबीज यांच्या समन्वयापासून ते अडीच-तीन किलोचा पूर्ण वाढ झालेला हाडामासाचा जीव तयार होण्याची ही प्रक्रिया आणि त्या बाळाचा योनीमार्गातून बाहेर पडण्याचा पहिला प्रवास या दोन्ही गोष्टी अतिशय गुंतागुंतीच्या आणि किचकट प्रक्रिया असल्या तरी परमेश्वराने त्या अतिशय सहज आणि सोप्या करून ठेवल्या आहेत.
त्यामुळेच, शंभर गरोदर स्त्रियांपैकी पंचाण्णव स्त्रियांची प्रसूती ही नैसर्गिकरीत्या, कोणत्याही अडथळ्याशिवाय आणि कोणाच्याही मदतीशिवाय होत असते. फक्त 5 टक्के स्त्रियांची प्रसूती ही अवघड असते; या पाचपैकी 4 टक्के स्त्रियांना प्रशिक्षित परिचारिका अथवा तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीची गरज भासते. फक्त 1 टक्का स्त्रियांची प्रसूती नैसर्गिकरीत्या होणं अशक्य असतं. अशा स्त्रियांचा आणि त्यांच्या पोटातील बाळाचा जीव वाचविण्यासाठी सिङोरिअन शस्त्रक्रियेची गरज भासते. प्रत्यक्षात आज काय परिस्थिती आहे? आज मोठय़ा शहरांमध्ये 50 टक्यांपेक्षा जास्त प्रसुती सिङोरिअन शस्त्रक्रियेद्वारा केल्या जातात. तालुक्याचा ठिकाणी हे प्रमाण थोडं कमी, म्हणजे 30 ते 40 टक्के आहे. पण दोन्ही ठिकाणी इतक्या झपाटय़ाने ही टक्केवारी वाढते आहे की काही वर्षानंतर नैसर्गिक प्रसूती ही वर्तमान पत्रतील चार कलमी ठळक बातमी ठरावी किंवा वैद्यकीय विद्याथ्र्याना शिकविण्यासाठी तयार केलेला दुर्मीळ व्हिडीओ म्हणून त्याचा विचार व्हावा.
अगदी साधी गोष्ट आहे. सिङोरिअन शस्त्रक्रियेचे बिल नैसर्गिक प्रसूतीच्या बिलापेक्षा किमान पाच ते दहा पटींनी जास्त असते. आज पैसा कुणाला नको आहे? नैसर्गिक प्रसूतीसाठी डॉक्टर आणि पेशंट दोघांना वाट पहावी लागते; स्त्रीला कळा सोसाव्या लागतात; डॉक्टरांना डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेऊन प्रसूतीच्या प्रत्येक टप्प्याचे निरीक्षण करावे लागते, ते नोंदवून ठेवावे लागते. एवढे करूनही आई किंवा बाळाच्या बाबतीत जर चुकून काही अपघात झालाच, तर डॉक्टरला मारहाण, हॉस्पिटलवर दगडफेक, वर्तमानपत्रत बदनामीकारक बातमी, वर्षानुवर्षे ग्राहक कोर्टात आणि फौजदारी कोर्टात चालणारे खटले हे शुक्लकाष्ठ मागे लागते.
या उलट सिझर करणं अतिशय सोपं. बधिरीकरण (भूल) शास्त्रत झालेल्या प्रगतीमुळे, महागडय़ा परंतु परिणामकारक प्रतिजैविकांमुळे, भूलतज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीमुळे, रक्तपेढय़ांच्या जाळ्यामुळे सिङोरिअन शस्त्रक्रिया पूर्वीपेक्षा खूप सोपी आणि निर्धोक झाली आहे. या शस्त्रक्रियेमुळे रुग्ण दगावण्याची शक्यता नगण्य, म्हणजे लाखात एक इतके कमी झाले आहे.
त्यामुळे ना डॉक्टरांची रिस्क घेण्याची तयारी आहे ना, पालकांची!
मात्र नैसर्गिक प्रसूतीचे रूपांतर सिङोरिअनमध्ये करण्याचा डॉक्टरांचा निर्णय 9क् टक्के वेळा चुकीच्या गृहितकावर आधारलेला असतो. बाळाच्या आणि आईच्या जिवाची भीती घातली, की आधीच धास्तावलेले नातेवाइक लगेचच ऑपरेशनला परवानगी देतील, अशी डॉक्टरांना खात्री असते. कळांनी अर्धमेली झालेली पेशंट नातेवाइक ऐनवेळी कोठे घेऊन जाणार? आणि अशी ऐनवेळी आलेली पेशंट प्रसूतीसाठी घेण्याची पद्धत आजकाल शहरात काय, पण खेडय़ातसुद्धा नाही.
प्रसूतीसाठी सिङोरिअनचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी काय उपाय योजना करता येतील, याविषयी आज जगभर विविध पातळ्यांवर चर्चा सुरू आहे. तथापि, नैसर्गिक प्रसूतीचे सिझरमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय हा पूर्णपणो संबंधित स्त्रीच्या बाळंतपणात काळजी घेणा:या डॉक्टरांचा आणि ऐनवेळी घेतला जाणारा निर्णय असल्याने आणि हा निर्णय आई आणि बाळाचे प्राण वाचविण्यासाठी घेतला जात असल्याने कोणत्याही पातळीवर या निर्णयाला आव्हान देणं अशक्य आहे. शासकीय आणि खाजगी रुग्णालयातील प्रत्येक सिझरचे ऑडिट करण्याचा प्रस्तावही मध्यंतरी विचाराधीन होता; पण संबंधित डॉक्टरांच्याच विरोधाने तो बारगळला.
नैसर्गिक प्रसूतीची वाट पाहणारे, सिङोरिअनचा पर्याय टाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारे डॉक्टर्स आज खूप कमी आहेत हे वास्तव आहेत.
वाट पाहणो, ही प्रसूतीशास्त्रतील एक सुंदर कला आहे. इंग्रजीत तिला Masterly Inactivityअसं नाव आहे. जरूर ती सर्व काळजी घेऊन, जरूर ती सर्व निरीक्षणं नोंदवून आणि जरूर त्या सर्व तपासण्या करून, नंतर निसर्गाला आपलं काम करू देण्यासाठी शांतपणे वाट पहायची. ही कला आत्मसात करणं वाटतं तितकं सोपं जरी नसलं तरी फार अवघड आणि अशक्यही नाही. अतिशय अवघड परिस्थितीत, सर्व अडथळ्यांवर मात करून, नैसर्गिक प्रसूती करण्यात जो आनंद आणि समाधान डॉक्टर आणि पेशंटला मिळतं ते सिङोरिअन चोपून मिळणारा पैसा आणि समाधानापेक्षा खुप उच्च प्रतीचं असतं, हे मी गेल्या पस्तीस वर्षात खूपदा अनुभवलेलं आहे.
सिङोरिअन करण्याआधी किती वाट पहावी, याबाबतचा इ.स. 1500सालातील एक किस्सा शेवटी सांगतो. ही घटना स्वित्झर्रलडमधील आहे. त्या काळी सिङोरिअन शस्त्रक्रिया जिवंत स्त्रीवर करण्यास कायद्याने बंदी होती. गरोदर स्त्रीचा अकस्मात इतर काही कारणाने अपघाती मृत्यू ओढवला, तर बाळाला वाचविण्यासाठी मयत स्त्रीचे पोट कापून बाळ बाहेर काढले जाई. जेकॉब न्यूफर नावाच्या इसमाने आपल्या पत्नीचे सिङोरिअन ऑपरेशन करण्याची परवानगी स्थानिक प्रशासनाकडे मागितली. सदर स्त्री सहा दिवस प्रसूतीच्या कळा देत होती आणि तेरा परिचारिकांनी तिची प्रसूती करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. सहा दिवस वाट पाहूनही प्रसूती होईना, म्हणून अखेर सिङोरिअन ऑपरेशनची परवानगी प्रचंड वादावादीनंतर देण्यात आली. ऑपरेशननंतर बाळबाळंतीण सुखरूप असल्याची दुर्मीळ घटना घडली. त्या स्त्रीने नंतर पाच मुलांना नैसर्गिकरीत्या जन्म दिला. त्यातील एक जुळे होते. सिङोरिअनने जन्माला आलेली मुलगी पुढे 77 वर्षे जगली आणि भरपूर म्हातारी होऊन मेली.
तुम्ही न्यूपरइतकी वाट पाहू नका; पण थोडी तरी वाट पहायला काय हरकत आहे?
सिझर करण्यासाठी सांगितली जाणारी ४ कारणं.
१.बाळाच्या गळ्याला नाळेचे वेढे आहेत.
---------------------------------------
सिझर करायला हवं ‘‘बाळाच्या गळ्यात नाळेचे वेढे आहेत’’ असं डॉक्टर अनेकदा सांगतात. आणि सिझर करायला चटकन राजी होतात. पण हे खरं नव्हे. पोटातील बाळाला प्राणवायूचा आणि अन्नद्रव्यांचा पुरवठा नाळेवाटे होत असतो. गर्भातील बाळाची फुफ्फुसे तयार झालेली नसतात (जन्मल्यावर बाळ पहिल्यांदा श्वास घेते, तेव्हाच फुफ्फुसाचे कार्य सुरू होते). त्यामुळे नाळेचे हजार वेढे जरी बाळाच्या मानेभोवती पडले, तरी नाळेतून होणारा रक्तपुरवठा कायम असल्याने बाळाला काहीही त्रस होण्याचा प्रश्नच नसतो. वस्तुत: गर्भाशयातील पाण्याच्या डोहात मनसोक्त फिरत असताना बाळाच्या मानेभोवती नाळेचे वेढे पडणं, ही पूर्णपणो नैसर्गिक क्रिया आहे. नैसर्गिक प्रसूती होताना हे वेढे प्रसूतीसमयी जवळ असलेल्या डॉक्टर अथवा परिचारिकेला नेहमीच दिसत असतात आणि बाळाला त्यामुळे कधीही काहीही त्रस होत नाही.
२.गर्भाशयातील पाणी कमी झालंय.
---------------------------------------
गर्भाशयातील पाणी कमी होतंय आणि बाळ कोरडं पडतंय हे सिझरचं दुसरं कारण. हे कारण सुद्धा पहिल्या कारणाइतकंच तकलादू आहे. गरोदरपणातील नऊ महिन्यांपैकी पहिल्या सात महिन्यात बाळाची वाढ कमी आणि पाण्याची वाढ जास्त असते. या उलट सातव्या महिन्यानंतर गर्भाशयात बाळ वेगाने वाढू लागतं आणि पाणी त्याप्रमाणात कमी होऊ लागतं. याचाच साधा अर्थ असा की, गर्भाशयातील पाणी कमी होण्याची प्रक्रिया प्रसूतीच्या दोन महिने अगोदर सुरू झालेली असते. बरेचदा, प्रसूतीच्या कळा सुरू होण्यापूर्वी पाणमूठ फुटून गर्भाशयातील बरंच पाणी निघून जातं आणि त्यानंतर 24 तासात नैसर्गिक कळा सुरू होतात. काही वेळा, दिवस उलटून गेल्यावर कळा सुरू करण्यापूर्वी पाणमूठ फोडणं हा पूर्वापार चालत आलेला उपाय आहे. यात अनैसर्गिक असं काहीही नाही. बाळ कोरडं पडेल, हे डॉक्टरांच्या अचाट कल्पनाशक्तीचे उदाहरण आहे. या व्यतिरिक्त त्या विधानाला काहीही अर्थ नाही.
३.बाळानं पोटात शी केली.
----------------------------------
प्रसूतीची प्रत्येक कळ बाळाला गर्भाशयातून खाली ढकलण्यासाठी आणि गर्भाशयाचे तोंड उघडण्यासाठी असते. बाळाच्या पोटावर या क्रियेने दाब पडला, की बाळाला शी होणं ही अशीच नैसर्गिक क्रिया आहे. उलट अशी शी होणो, हे बाळाचे गुदद्वार आणि आतडी पूर्णपणो विकसित आणि नॉर्मल असल्याचे लक्षण आहे. ही विष्ठा जंतु विरहित असते. त्यामुळे बाळाने अशी शी गिळली, तरीही त्याला या शी पासून काहीही धोका नसतो. बाळाच्या जन्मानंतर लगेचच सक्शन मशिनने ही शी बाहेर काढून टाकण्याची पूर्वापार पद्धत आहे. पण बाळानं पोटात शी केली हे कारण सांगून हल्ली सर्रास सिझर केलं जातं.
४.बाळाचे ठोके अनियमित झाले आहेत.
--------------------------------
गर्भाशयाच्या प्रत्येक आकुंचनाबरोबर बाळाचा रक्तपुरवठा कमी होत असतो; बाळाचे ठोके अनियमित होत असतात. दोन कळांमधील काळात हा रक्तपुरवठा आणि ठोके पूर्ववत होतात. ही क्रिया बाळाचा जन्म होईस्तोवर चालू असते. कळा सहन करण्याची बाळाची ताकद अमर्यादित असते, हे सत्य प्रसूती प्रक्रियेस मदत करताना मी हजारो वेळा अनुभवलेले आहे. दोन दोन अथवा तीन तीन दिवस घरी कळा देऊन नंतर माङयाकडे येऊन नैसर्गिक प्रसूती झालेल्या बाळाची तब्येत आणि रडणं खणखणीत असतं. त्यामुळे बाळाचे ठोके अनियमित झालेत असं सांगणं हेदेखील एक फसवं कारण आहे.
डॉ. अशोक माईणकर
(लेखक सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे येथे स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ आहेत. या क्षेत्रत कामाचा त्यांना 35 वर्षाहून अधिक अनुभव आहे.)

Tuesday, June 23, 2015

"शिका, संघर्ष करा, संघटित व्हा!"


"शिका, संघर्ष करा, संघटित व्हा!"

बाबासाहेबांनी आम्हाला जी यंत्रणा शिकवली ती आम्ही या साठ वर्षांत अजूनही शिकलेलो नाही. कुठल्याही विहारात जा किंवा एखादा बैनर फलक पहा, किंवा अगदी एखाद्या शिक्षण संस्थेतही पहा बाबासाहेबांचा एक संदेश मोठ्या दिमाखाने झळकत असतो. "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा." मागे एकदा आमच्या इथल्या चैतन्य विहारात याबद्दल मी बोलत असताना मला अनेक वयस्क माणसांनी विरोध केला मात्र जेव्हा त्यांना विनंती करून विनयपूर्वक मुद्दा पटवून दिला तेव्हा तो त्यांना पटला. मात्र इतकी वर्षे ते हाच उपरोक्त संदेश प्रमाण मानून जगत होती, कदाचित त्यामुळेही आजची ही विदारक अवस्था समाजाने आपल्यावर ओढावून घेतलेली असावी.
Educate, Agitate and Organise असा तो मूळ इंग्रजी संदेश आहे. अर्थात शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा. आपण हा क्रम चुकवत आलो आहोत, आणि हा क्रम चुकवण ही साधी गोष्ट नसून भयंकर प्रमाद आहे असे मी मानतो. बाबासाहेबांनी प्रत्येक लढ्यात किंवा त्यांच्या भाषणात लिखाणात एक मैकेनिज्म तयार करून दिलाय. एक यंत्रणा निर्माण करण्याचे तंत्र निर्माण करून दिलेय. आमची पिढी पैंथरला प्रमाण मानून लढा उभा करण्याचा प्रयत्न करते तेव्हा त्याच्या उद्दिष्टपूर्तीची शंका माझ्या मनात निर्माण होत राहते. का नाही आपण बाबासाहेबांनी केलेल्या सत्याग्रहांवर आधारीत एखादा लढा उभा करण्याचा प्रयत्न करत? दगड फेकून क्रांती होते ही त्यांची शिकवण नाही म्हणूनच की काय चवदार तळ्याच्या सत्याग्रहावेळी सत्याग्रहींवर जो हल्ला झाला त्याला प्रतिउत्तरात लाठ्याकाठ्यांचा हल्ला न करता अगदी शांतपणे मात्र अत्यंत विचारपूर्वकपणे बाबासाहेबांनी त्याच भूमीत नऊ महिन्यांनी त्या विषमतेचा समूळ धिक्कार केला आणि तोही असा की हल्लेखोरांसोबत हल्लेखोरांचे टेक्नोक्रैट जे आहेत त्यांचेही दात घशात घातले जातील.
नेहमी वाटत आले आहे की रीडिंग बाबासाब इज वन थिंग अँड लर्निंग बाबासाब इज वन थिंग. त्यामुळेच शिका संघर्ष करा संघटित व्हा याचा क्रम आपण चुकीचा लावला.
बाबासाहेब म्हणतात Educate - शिका, म्हणून आम्ही नुसत्या डिग्र्या घेत सुटण्याला अर्थ नाही. शिका म्हणजे औपचारिक शिक्षणासोबतच परिवर्तनाचा लढाही शिका. सीमेवरती लढाईला कुणीही सामान्य नागरिक जाऊ शकतो का? नाही. कारण त्या लढाईचे तंत्रशुद्ध शिक्षण घेणे गरजेचे आहे. कुणीही हृदयाची शस्त्रक्रिया करू शकत नाही त्याला अथक शिक्षणाची आवश्यकता आहे. मग केवळ आपण बौद्ध किंवा मागासवर्गीय किंवा तत्सम कुटुंबात जन्माला आलो, त्रिसरण पंचशील आणि जयभीम म्हणत वाढलो म्हणून आम्ही आंबेडकरी झालो का? किंवा आंबेडकरी लढाई लढण्यासाठी पात्र झालो का? तर माझ्यामते नाही. कारण अजूनही आम्ही बाबासाहेबांचा विचार नेमकेपणाने आत्मसात केलेला नाही. तो आत्मसात करणे आणि येणाऱ्या पिढ्यांकडे ट्रांसफर करणे म्हणजे बाबासाहेबांच्या संदेशाच्या दृष्टीने "शिका" आहे असे मला वाटते.
मग येते Agitate - संघर्ष करा. आता हा संघर्ष कशासाठी? या देशात स्वातंत्र्य समता बंधुता न्याय आणि लोकशाहीमूलक समाज आणि राज्यव्यवस्था निर्माण करण्यासाठी संघर्ष करणे. परिवर्तनासाठी किंवा त्यांच्याच भाषेत प्रतिक्रांतिशी मुकाबला करणारी क्रांति निर्माण करण्यासाठीचा संघर्ष. संघर्ष करा या संदेशात उपरोक्त सर्व अंतर्भूत होईल यात दुमत असण्याचे कारण नाही. पण मग हा संघर्ष नेमका करायचा कसा?
यासाठी बाबासाहेबांच्या संदेशातील अंतिम शब्द महत्वाचा आहे. "संघटित व्हा". मला वाटत बाबासाहेबांच्या संदेशातील "संघर्ष करा" हा संदेश "संघटित होण्यासाठी संघर्ष करा" या अर्थाने आहे.
Orgnise - संघटित व्हा. संघटित कुणी व्हायचे आहे? बौद्ध समाजाने? आंबेडकरी समाजाने? की आणखी कुणी? संघटित व्हायचे आहे या देशातील त्या ८५% जनतेने जी आजवर शोषित वंचित, प्रगतीच्या दृष्टीने मागास राहिली आहे. त्यात केवळ SC च नाही तर या देशातील OBC, SC, ST, NT, VJ या सर्वांनी संघटित होऊन जे १५% लोक आजवर सत्ता, शास्त्र, शस्त्र आणि संपत्ती याच्या जोरावर राज्य करत आलेत, अन्याय करत आलेले आहेत त्या ब्राम्हणवादी, भांडवलवादी, विषमतावादी लोकांविरुद्ध संघर्ष करायचा आहे. म्हणजे लाठ्याकाठ्यांचा संघर्ष नाही तर या संघटित शक्तीने या देशात स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्यायप्रणव समाजव्यवस्था निर्माण करणे आणि या देशाची राजसत्ता काबिज करणे हे होय. जोपर्यंत या देशाचा शोषित वंचित घटक देशाच्या सत्तेत येत नाही तोपर्यंत या देशात लोकशाही टिकणे आणि वाढणे अशक्य आहे.
म्हणूनच शिका संघटित व्हा संघर्ष करा असा संदेश नसून शिका संघर्ष करा आणि संघटित व्हा असा बाबसाहेबांचा संदेश आहे. ज्या दिवशी या देशातील ८५% जनता संघटित होईल त्यादिवशी तिला कुठलाही वेगळा संघर्ष करायची गरज नाही. पण संघर्ष करावा लागणार आहे तो ही ८५% जनता संघटित करण्यासाठी. त्यासाठी तरुणांनी पुढे येणे गरजेचे आहे, विचारधारा समजून घेणे गरजेचे आहे आणि ती कृतीत उतरवून ती यंत्रणा निर्माण करणे गरजेचे आहे जिचा बाबासाहेब आग्रह धरतात.
एखाद्या संघटनेतील कार्यकर्ते स्वतःची सद्सद्विवेक बुद्धी वापरून योग्य काय अयोग्य काय हे समजून घेत नसतील आणि जे अयोग्य आहे त्याविरोधात ठाम भूमिका घ्यायला अक्षम असतील तर अशी संघटना ही लोकशाहीला मारक आणि हुकुमशाहीला पूरक ठरत असते. आंबेडकरवादी विचारांचा दावा करणाऱ्या संघटना आणि राजकीय पक्ष यांच्यामध्ये हा सद्सद्विवेकबुद्धीने विचार करणारा कार्यकर्ता नसल्याने ह्या संघटना अथवा पक्ष सतत अपयशी ठरत आलेले आहेत. हा सद्सद्विवेकबुद्धीचा कार्यकर्ता निर्माण करणे ही पहिली गरज आहे. कुणीतरी ढकलत जातेय आणि आपण ढकलले जातोय अशी परिस्थिती आहे.
म्हणूनच १९५४ साली गोखले इंस्टिट्यूट पुणे येथे लोकशाही आणि लोकशाहीच्या यशस्वितेच्या सात अटी सांगताना शेवटचे दोन अटी बाबासाहेब सांगतात,
६) नितीमान समाजाची गरज.
७) सार्वजनिक विवेकबुध्दी हे लोकशाहीचे आश्रयस्थान.
आज हुकुमशाही वृत्ती बळावू पाहणाऱ्या शक्तींना आवर घालण्यासाठी स्वतःची सद्सद्विवेक बुद्धी वापरणारा नीतिमान समाज निर्माण करण्याची गरज आहे. अन्यथा या देशातील ८५% शोषित वंचित समाजाची असंघटितता आणि उदासीनता ही लोकशाहीला मारक आणि हुकुमशाहीला पूरक ठरणारी आहे. बाबासाहेबांचा विचार समजून तो कृतीत आणण्याची नितांत आवश्यकता आज आहे.
जयभीम, नमो बुद्धाय.
-- डॉ. आशिष तांबे
टिटवाळा, ठाणे.
२३.०६.१५

Friday, June 19, 2015

कैसे डॉ आंबेडकर ने संविधान को बौद्ध धम्म पर आधारित किया है

बहुजन नायक श्री पार्शव नाथ मौर्या जी के भाषण के विडिओ, विषय “कैसे डॉ आंबेडकर ने संविधान को बौद्ध धम्म पर आधारित किया है”

Wednesday, June 3, 2015

Review of डाॅ.बाबासाहब अंबेडकर फिल्म



जब्बार पटेल ने डाॅ.बाबासाहब अंबेडकर यह फिल्म बनाकर बहुजन समाज को की गुमराह करने की कोशिश



महाराष्ट्र सरकार और केंद्र सरकार ने जब्बार पटेल को पकडकर सन 2000 मे एक फिल्म बनाई थी जिसका नाम डाॅ.बाबासाहब अंबेडकर था। इस फिल्म में बाबासाहब का किरदार दक्षिण भारत के अभिनेता ममूटी इन्होंने निभाया था। बहोत से लोगों ने इस फिल्म की बहोत प्रशंसा की थी लेकिन हमे यह नही पता था की जब्बार पटेल ने बाबासाहब अंबेडकर जी इनके चरित्र को तोड मरोडकर दिखाया था। तो आईए जानते हैं की आखिर जब्बार पटेल ने बहुजन समाज को गुमराह करने के लिए फिल्म में बाबासाहब अंबेडकर जी इनको कैसे दिखाया था।

ध्यान मे रखिए इस फिल्म के डायरेक्टर जब्बार पटेल यह 'राष्ट्र सेवा दल' की पार्श्वभूमि से आए हुए हैं। जब्बार पटेल जवानी मे 'राष्ट्रसेवा दल' मे काम करते थे।

1) फिल्म में देखिए:- बाबासाहब अंबेडकर जी की फिल्म में अमेरिका में विद्यार्जन के समय जो दृश्य हैं उसमें वेटर बनने का दृश्य हैं, वहाँ एक निग्रो आदमी के साथ संवाद दिखाया गया हैं। वह निग्रो भी वहाँ वेटर का काम कर रहा था। वह निग्रो बाबासाहब अंबेडकर जी को कहता हैं की, " कुछ भी क्यों न हो तुम लोगों को पढ़ने का तो अधिकार हैं मुझे तो पढ़ने का भी अधिकार नही हैं।"
यह संवाद लिखनेवालें ने ऐसा संवाद दिखाकर यह संदेश देने की कोशिश की, की " अन्याय केवल भारतीय अछूतों के साथ ही नही होता अन्याय धरती पर हर जगह होता है।" अन्याय भारत के अछूतों के साथ ही नही दुनिया में और जगह अन्याय होता हैं। निग्रो के साथ अमेरिका में जो अन्याय होता हैं उसकी तुलना में अछूतों के साथ भारत में जो अन्याय ब्राह्मण करते हैं वह तो कुछ भी नही हैं अमेरिका में तो ज्यादा अन्याय होता हैं। ऐसा दृश्य दिखाकर स्क्रिप्ट लिखनेवालों ने यह संदेश देने की कोशिश की, की ब्राह्मण उतने ज्यादा अन्यायकारी नहीं हैं जितना की उन्हें अन्यायी और अत्याचारी समझा जाता हैं।

2) एक सीन मे बाबासाहब अंबेडकर लायब्रेरी से बाहर आ रहे हैं तो उस वक्त एक अंग्रेज व्यक्ति एक निग्रो को सडक सड़क पर पीट रहा हैं और बाबासाहब अंबेडकर जी चूपचाप देख रहे हैं यह सीन बहोत देर तक चल रहा हैं। उस निग्रो को एक अंग्रेज मार रहा हैं, उसे गालियाँ दे रहा हैं, उसके उपर अन्याय कर रहा हैं और बाबासाहब अंबेडकर जी वहा चूपचाप खड़े हैं क्या यही बाबासाहब अंबेडकर जी इनकी छवी थी। बाबासाहब अंबेडकर जी तो अन्याय बर्दाश्त नही करते थे बल्कि अन्याय के खिलाफ आवाज उठाते थे। यह दृश्य दिखाकर बाबासाहब अंबेडकर जी इनकी छवी खराब करने की कोशिश की हैं।

3) महाड के चवदार तालाब के सत्याग्रह का दृश्य फिल्म में दिखाया गया हैं। उस दृश्य में एक बात बताई गई हैं की वहाँ चितले नाम का कोई ब्राह्मण हैं। उस वक्त मनुस्मृति जलाने का प्रस्ताव वह ब्राह्मण करता हैं। उस दृश्य में चितले कहता हैं, " वैसे तो जन्म से मैं ब्राह्मण हूँ, फिर भी मैं मनुस्मृति का घोर निंदक हूँ।" यानी उस फिल्म में मनुस्मृति जलाने का श्रेय चितले नामक ब्राह्मण व्यक्ति को दिया गया हैं।

4) महाड के ब्राह्मण लोगों ने महाड के चवदार तालाब के बारे में बम्बई कोर्ट में केस दायर किया था, मगर फिल्म बनाने वाले ने फिल्म में यह डायलाॅग लिखा की, 'महाड के सवर्ण ने कोर्ट मे दावा दाखिल किया हैं'। यानी फिल्म में ब्राह्मणों को बचाने के लिए 'ब्राह्मण शब्द की बजाय 'सवर्ण' शब्द का ईस्तेमाल किया गया। आप एक बात पर गौर किजीए अगर श्रेय लेना हो तो चितले को ब्राह्मण बताया गया और जिन्होंने सत्याग्रह के खिलाफ केस दायर किया वे ब्राह्मण होकर भी उनके लिए सवर्ण शब्द का ईस्तेमाल किया गया।

5) एक दृश्य में बाबासाहब अंबेडकर जी पढ़ रहे हैं वहाँ लाला लाजपत राय बाबासाहब अंबेडकर जी को आकर कहते हैं कि आप आजादी के आन्दोलन में शामिल हो जाओ, उनके जो प्रोफेसर हैं वह भी उनको यही कहते हैं, बाबासाहब अंबेडकर जी इससे इनकार करते हुए कहते हैं कि, मैं आजादी के इस आंदोलन ने शामिल नहीं हो सकता क्योंकि मैं यहाँ पढ़ने आया हूँ। यह बात सत्य हैं लेकिन यह दृश्य दिखाने का मतलब कुछ और था। वह यह हैं की बाबासाहब अंबेडकर जी स्वतंत्रता के आंदोलन में शामिल नही थे।

6) पूना पैक्ट का एक दृश्य फिल्म में दिखाया गया हैं उस दृश्य में गांधी और बाबासाहब अंबेडकर जी का जो संवाद दिखाया गया हैं उस संवाद में बाबासाहब अंबेडकर जी को गांधी को बापू बोलते हुए दिखाया गया हैं जबकि बाबासाहब अंबेडकर जी ने गांधी को कभी बापू नही कहाँ उन्होंने सदैव गांधी को "मिस्टर गांधी" या गांधीजी कहाँ।
याद रखिए बाबासाहब अंबेडकर जी इन्होंने 1955 में बी.बी.सी.वर्ल्ड को एक मुलाकात दी थी उस मुलाकात के दौरान बी.बी.सी. पत्रकार ने बाबासाहब अंबेडकर जी को एक सवाल पुछा था वह सवाल यह था:-

बी.बी.सी. पत्रकार:- क्या आपको लगता हैं की गांधी का बरताव एक दुष्ट राजनेताओं जैसा था?
बाबासाहब अंबेडकर:- हाँ! किसी दुष्ट राजनेता जैसा ही!! वे कभी महात्मा नही थे। मैं उनको महात्मा कहने के खिलाफ हूँ। मैंने अपने पुरे जिवन में उन्हें कभी महात्मा नही कहा। वह उपाधी उन्हें शोभा नही देती। नैतिकता से भी वे महात्मा कहने के लायक नही हैं।
बाबासाहब अंबेडकर जी खुद कहते हैं की मैंने गांधी को कभी महात्मा कहाँ नही तो फिर फिल्म में बाबासाहब अंबेडकर जी इनको गांधी को महात्मा कहते हुए क्यों दिखाया गया? इसके पिछे भी एक साजिश हैं।

7) बाबासाहब अंबेडकर जी 24 सितम्बर 1932 को पूना पैक्ट पर हस्ताक्षर करते हैं और उसके बाद फिल्म में यह दृश्य दिखाया गया की बाबासाहब अंबेडकर जी 25 सितम्बर को बम्बई मे एकांत में बैठे हैं, कमरा अंधेरे से ढँका हुआ हैं, उसमें अकेले ही चिंता में बैठे हैं। मगर वास्तव मे बाबासाहब अंबेडकर जी 25 सितम्बर को बम्बई मे बैठे हुए नहीं थे बल्कि 24 सितम्बर को पुना पैक्ट पर हस्ताक्षर कर 25 सितम्बर को बम्बई के चैम्बर ऑफ काॅमर्स में पुना पैक्ट के विरोध में भाषण करते हैं। अगर यह बात और भाषण फिल्म में होता तो असलियत सामने आ जाती।

8) बाबासाहब अंबेडकर जी इनको एक दृश्य में कुछ अंग्रेज छात्राओं के साथ मटन खाते हुए दिखाया गया हैं उसके पिछे भी बड़ी साजिश की गई हैं। वह साजिश यह हैं की बौद्ध धम्म में किसी भी पशु या प्राणी की हत्या करना गलत माना जाता हैं। यह दृश्य दिखाकर यह बताया गया की बौद्ध धम्म में यह सब होने के बावजूद बाबासाहब अंबेडकर जी मटन क्यो खाते हैं? उसी दृश्य में एक अंग्रेज छात्र उसे मटन न मिलने की वजह से वो बाबासाहब अंबेडकर जी इनको भारतीय लोग बाएँ हाथ का कैसे ईस्तेमाल करते हैं यह बताते हुए दिखाया गया हैं। इसका मतलब की बाबासाहब अंबेडकर जी इनके साथ भारतीय ब्राह्मणों ने ही नहीं बल्कि अंग्रेज छात्रों ने भी बदसलुखी की थी और उसी अंग्रेजों के मंत्रिमंडल में और उन्हीं अंग्रेजों के बाबासाहब अंबेडकर जी समर्थक थे ऐसा अप्रत्यक्ष रूप से दिखाया गया।

9) फिल्म में माता रमाई के परिनिर्वाण का एक दृश्य दिखाया गया हैं। पार्थिव शरिर के पास बैठे हुए बाबासाहब अंबेडकर जी जब यह देखते हैं की रमाबाई को हरे रंग की साड़ी पहनाई गई हैं तब वे अपने लोगों से कहते हैं की, " उसकी आखिरी इच्छा तो सफेद साड़ी पहनने की थी, आगे डायलाॅग लिखने वाले ने लिखा की, ' परंपरा तो हरी साड़ी पहनने की हैं' तो बाबासाहब अंबेडकर जी इनको सिर हिलाते हुए दिखाया गया। फिल्म बनानेवालों का एक ही उद्देश था की, बाबासाहब अंबेडकर जी प्रथा और परंपरा के आगे झुकते थे और बाबासाहब अंबेडकर जी ने प्रथा परंपरा विरोध में जो आंदोलन चलाया वह महज एक ढोंग था।

10) बाबासाहब अंबेडकर जी इनको संविधान सभा में पहुँचाने का श्रेय गांधी को देने का प्रयास फिल्म के किया गया हैं।

11) बाबासाहब अंबेडकर जी इन्होंने 14 अक्तूबर 1956 को नागपूर में भदन्त चंद्रमणी के हाथों बौद्ध धम्म क दिक्षा ली थी और खुद अपने हाथों अपने लाखों अनुयायी को बौद्ध धम्म की दिक्षा दी थी। उस वक्त बाबासाहब अंबेडकर जी इन्होंने अपने अनुयायियों को 22 प्रतिज्ञाएँ दी थी। फिल्म में 14 अक्तूबर 1956 का दृश्य तो दिखाया गया किन्तु बाबासाहब अंबेडकर जी इन्होंने जो 22 प्रतिज्ञाएँ दी थी वर पुरी नही दिखाई खासकर पहली 9 प्रतिज्ञाएँ जो हिन्दू धर्म के खिलाफ थी।

जब्बार पटेल की 'डाॅ.बाबासाहब अंबेडकर' यह हिन्दी फिल्म सिर्फ एक मनोरंजन हैं। इसमें ऐसा कुछ खास नही जिससे हमे कुछ सिखने को मिले और इसमे खास बात तो यह हैं की इस फिल्म में बाबासाहब अंबेडकर जी के जिवन के सच्चे पहलू और संघर्ष नही दिखाया गया। उल्टा बाबासाहब अंबेडकर जी इनको खलनायक साबित करने की कोशिश की गई थी।