Sunday, March 22, 2015

मी संपूर्ण आयुष्यात कधीही प्रार्थना केली नाही


विद्यार्थी व तरूणांचे प्रेरणा स्थान क्रांतीविर भगतसिंग यांच्या बलीदान दिनानिमीत्त (23 मार्च 1931) त्यांच्या स्मृतीस विनम्र अभीवादन...!

आजच्या दिवशी म्हणजे दिनांक 23 मार्च,१९३१ रोजी स्वातंत्र्यवीर भगतसिंग (जन्म : सप्टेंबर २७, १९०७ - मृत्यू : मार्च २३, १९३१) लाहोरच्या तुरुंगात हसत हसत फासावर गेले. फाशी जाताना त्यांचे वय अवघे २३ वर्षांचे होते. त्यांना ’शहीद-ए-आलम’ असा किताब दिला जातो. त्यांच्या स्मरणार्थ २३ मार्च हा दिवस, भारतात शहीद दिन म्हणून पाळला जातो. भगतसिंग यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून युवकांनी वर्तन केले पाहिजे.
"ज्यांना वाट चुकलेली पोरे म्हणतात, तीच पोरे क्रांती करतात...." विर भगतसिंग
फाशीवर चढवताना एक सरदार भगतसिगाना म्हणतो.माझ्याजवळ धर्मग्रथ आहे. आता तरी काहीतरी वाच. त्यावर भगतसिंग म्हणाले.
"आज,यावेळी जर मी प्रार्थना केली तर तुमचा देव मला भिञा म्हणेल.मी संपूर्ण आयुष्यात कधीही प्रार्थना केली नाही, ती मी आज केली तर तो म्हणेल की हा भितीपोटी प्रार्थना करतो आहे कारण आजवर मी तसा जगलो आहे.माझ्यावर कुणी असा आरोप करणार नाही की जन्मभर मी नास्तिक राहिलो पण अखेरच्या वेळी भितीपोटी आस्तिक झालो" या देशातील तरूणांनी शहीदे आजम भगतसिंह यांचा आदर्श घ्यावI

No comments :