Sunday, September 28, 2014

आमच्या सर्व सामाजिक दुखन्यावर, माझ्या मताप्रमाने हेच औषध आहे

भारतातील दलित समाजाची उन्नति करने म्हणजे त्यांच्या अन्न,वस्त्र व निवार्याची सोय करून पुर्विप्रमानेच त्याना उच्च वर्गाची सेवा करण्यास लावणे नव्हे. खालच्या वर्गाची ज्याच्यामुळे प्रगति खूंटून त्याना दुसर्याचे गुलाम व्हावे लागते तो न्यूनगंड त्यांच्यापासून नाहीसा करने, चालु समाजपध्द्तिमुळे जे त्यांचे जीवन निर्दयपने लुबडन्यात आले आहे. त्याचे त्यांच्या स्वता:च्या आणि राष्ट्राच्या दृष्टीने काय महत्व आहे याची त्याना जाणीव करून देने हाच खालच्या वर्गाचा प्रश्न आहे.
'उच्च शिक्षणाच्या प्रसाराखेरिज कशानेच हे साध्य होणार नाही. आमच्या सर्व सामाजिक दुखन्यावर, माझ्या मताप्रमाने हेच औषध आहे.'
संदर्भ- जनता, २२ सप्टेम्बर १९५१
- विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर
-------------------------------------
Like 

No comments :