
जगाच्या पाठीवर इस्लाम आणिख्रिश्चन या दोन महाशक्ती आहेत.
या दोघाच्या युध्दात तिसरी शक्ती
निर्णायक ठरणार आहे.ती तिसरी
शक्ती म्हणजे बौध्द शक्ती.
जगातील एकुन बौध्द धर्मियां
पैकी ९८ टक्के लोक आशिया खंडात
राहतात.बौध्दाची लोकसंख्या जगभर
पसरली आहे.जगातील धार्मिक आधा-
रावरील लोकसंख्येच्या आधारे बौध्द
लोकसंख्या ४ था क्रमांक आहे. काही
निरीक्षकांच्या मते,हिंदु आणि बौध्दां-
ची लोकसंख्या एकञ केल्यास ती
लोकसंख्या दुस-या क्रमांकावर जाते.
जगातील पाचही खंडात बौध्द
धर्माचे अनुयायी आढळतात.यापैकी
बौध्द धर्मियांची जास्त लोकसंख्या
आशिया खंडात आहे.लोकसंख्येच्या
सारणीवरुन असे लक्षात येते की
जगातील सर्वात जास्त बौध्दाची लोक
संख्या ३९,१८,९४,१४३ असुन तिची
एकून लोकसंख्येशी टक्केवारी ३०
टक्के आहे.चीन,जपान,थायलंड,म्यान-
मार,दक्षिन कोरीया,मलेशिया या
देशात बौध्दधर्मीयांची संख्या जास्त
आहे.विशेषतःथायलंड,कंबोडीया,
मगोलिया आणि म्यानमार या देशात
९० टक्क्याहून अधिक लोकसंख्या
बौध्दांची आहे.
आशिया खंडातील अनेक देशा-
मध्ये बौध्द धर्माला अधिकृत शास-
किय धर्माचा दर्जा प्राप्त झाला आहे.
त्यामुळे त्या धर्माला शासनाचा पाठी-
बा देखील आहे.अलीकडे पाश्चिमात्य
देशातील बौध्दधर्मियांनी संख्या वाढत
असुन त्याच्याकडे वैज्ञानिक आणि
प्रगतीशील म्हणुन पाहीले जाते.अमेरी-
केसारख्या प्रगतीशील देशात बौध्दंची
लोकसंख्या ३० लक्ष आहे.
जगाच्या पाठीवरील देशांमध्ये
बौध्दांच्या लोकसंख्येशी ही स्थिती
असताना भारतात माञ निराशाजनक
स्थिती आहे. भारतात बौध्दधर्मियांची
संख्या एकून लोकसंख्येच्या,०.७टक्के
आहे.एकून बौध्दांची लोकसंख्या
असलेल्या देशाच्या तुलनेत भारताचा
१० वा क्रमांक आहे. जगातील काही
देशामध्ये ९० टक्क्याच्यावर लोकसं-
ख्या आहे आणि भारतात त्याचे प्रमाण
०.७ टक्के आहे याचा अर्थ अमेरीका
या देशाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात
बौध्दांची लोकसंख्या १ टक्के आहे.
अमेरीकेपेक्षाही भारतात बौध्दांची
टक्केवारी कमी असणे ही चिंतेची
बाब आहे.
जागतीक पातळीवर बौध्दांची
संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.जगात
बौध्दांची संख्या ७० कोटी असल्याचे
दाखवित असेल तरी प्रत्यक्षात ती
संख्या १ अब्ज ६० कोटी असल्याचे
म्हटले जाते याचा अर्थ ख्रिश्चनांच्या
लोकसंख्येनंतर दुस-या क्रमांकावर
बौध्दांचा क्रमांक लागतो.ख्रिश्चन आणि
मुस्लिम यांच्या तुलनेत बौध्दांची
संख्या वाढविणे हे जागतिक हिताचे
आहे.जगाला युध्दापासुन परावृत
करण्यासाठी बौध्दधम्माचा वृध्दिगत
आणि विस्तारीत करणे ,ही काळाची
गरज आहे
No comments :
Post a Comment