सगळ्यांनी वाचा आपली रमाबाई हि माता “रमाई” कशी झाली.... माता रमाबाई आंबेडकर यांना “रमाई” हे नाव कसे पडले !!
एकदा बाबासाहेब आणि रमाई दादर च्या राजगृह बंगल्यावर राहत होते.त्यावेळी एकदा अचानक बाबासाहेबांना परदेशी काही कामा निमित्त जायचे होते पण रमाई ला एकटी घरामध्ये कसे राहायला ठेवायचे म्हणून बाबासाहेब धारवाड च्या त्यांच्या वराळे मित्राकडे रमाई ला पाठवतात व काही दिवस तिकडेच राहायला सांगितले. ते वराळे काका धारवाड मध्ये लहान मुलांचे वस्ती गृह चालवत असत.त्या वस्ती गृहाच्या आवारात अनेक लहान मुले खेळायला येत असत.एकदा अचानक दोन दिवस ते लहान मुले खेळायलाच आली नाही. म्हणून रमाई वराळे काका यांना विचारते दोन दिवस झाली हि मुले कुठे गेली आहेत खेळायला आवारात का आली नाही. त्यावेळी वैराळे म्हणतात कि हि लहान मुले दोन दिवसा पासून उपाशी आहेत तर हि खेळायला कशी येतील. रमाई त्यांना विचारते हि मुले का उपाशी आहेत तर ते रमाईला बोलतात कि वसतिगृहाला जे अन्न धान्याच ग्र्यांड महिन्याला भेटत असायचं ते अजून मिळालेलं नाही ते मिळायला अजून तीन दिवस लागतील.अजून तीन दिवस हि मुले उपाशी च राहणार आहेत.
वराळे अगदी कंठ दाटून ते बोलतात. त्यावेळी रमाई लगेच आपल्या खोली मध्ये जाते आणि रडत बसते आणि कपाटातला सोन ठेवलेला डबा आणि आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून वराळे यांच्याकडे देते आणि म्हणते तुम्ही ह्या बांगड्या आणि डबा ताबडतोब विकून किंवा गहान ठेवून ह्या आणि लहान मुलांसाठी खाण्याच्या वस्तू घेवून या. मी अजून तीन दिवस हि लहान मुले उपाशी नाही पाहू शकत. त्यावेळी वराळे त्या बांगड्या आणि डबा घेवून जातात आणि लहान मुलांसाठी जेवणाच्या वस्तू घेवून येतात आणि लहान मुले त्यावेळी पोटभरून जेवण करतात. खुप आनंदी राहतात. हे पाहून रमाई खूप आनंदी होते.तिचा आनंद गगनात मावत नव्हता.मग त्यावेळी हि सगळी लहान मुले रमाबाई यांना रमाआई म्हणून बोलायला लागतात.आणि त्या क्षणा पासून रमाबाई हि माता रमाई झाली.आणि ती आपल्या सगळ्यांची आई झाली.
म्हणून ख्यातनाम गायक "मिलिंद शिंदे" बोलतात कि...
भुकेल्या मुलांची दशा पाहुनी,
भुकेल्या मुलांची दशा पाहुनी,
बांगड्या... सोन्याच्या रमान दिल्या काढुनी.
धन्य रमाई | धन्य रमाई ||
(धन्यवाद- सचिन सोरटे)
थोर पुरुषाची पत्नी होणे हे जसे महान कार्य, तशीच एक मोठी जबाबदारीही असते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणेज विसाव्या शतकातील एक महापुरुष. रमाईंनी बाबासाहेबांच्या ध्येयपथातील काट्यांची झाडलोट करून त्यांचा ध्येयवाद खडतर मार्ग अधिक सुगम बनविला. पतीच्या स्वीकृत कष्टमय जीवनात त्यांनी प्रामाणिकपाने साथ दिली. आपल्या कौटुंबिक सुखासाठी त्यांनी बाबासाहेबांकडून कसलीहीअपेक्षा केली नाही. उलट बाबासाहेबांच्या प्रत्येक लहान-मोठया कार्यात त्यांना यथाशक्तीप्रोत्साहित करून व स्फूर्ती देऊन त्यांच्या मागे सावलीसारख्या सतत उभ्या राहिल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना देखीलआपली पत्नी रमाईच्या कष्टमय जीवनाची जाणीव होती. रमाई सारखी सहचारिणी लाभली म्हणूनच आपण परदेशात जाऊन वर्षानुवर्षे उच्च शिक्षण घेऊ शकलो व अस्पृश्योद्धारा च्या सामाजिक कार्यात पूर्णपणे समरस होऊ शकलो, ही गोष्ट किंवा वस्तुस्थिती ते कधीही अमान्य करीत नसत.
पतीनिष्ठ रमाईचे उदाहरण दृष्टीसमोर ठेवून बाबासाहेब जाहीरपणे सांगत असत की, स्त्री हासमाजाचा अलंकार आहे. आपल्या कुटुंबाच्या अन कुळाचा नावलौकिक स्त्रियांच्या शिलावरच अवलंबून असतो. स्त्री ही जशी गृहिणी तशीच सुसंस्कारित समाज निर्माण करणारी माता आहे. परंतु वैवाहिक जीवनाच्या प्रारंभीच्या काळात त्यांच्यावरउपासमार, हालपेष्ट, दुःख, दारिद्र्य व चिंता यांचे जे प्रसंग ओढवले त्यामुळे त्यांच्या शरीर-प्रकृतीवर जो परिणाम तो कायमचाच त्या नेहमी आजारी असायच्या आणि एकदा त्या अंथरुणाला खिळल्या त्या कायामच्याच २७ मे १९३५ ला त्यांनी हळूच डोळे उघडले. आपल्याजवळ बाबासाहेबांना पाहून त्यांना मानसिक समाधान झाले. बाबासाहेबांकडे एकटक पाहूनत्यांनि क्षीण हास्य केले. आणि पतीचे रूप ती साध्वी आपल्या हृदयात नेहमीकरिता जणू साठवून ठेवीत होती.
बाबासाहेबांनी देखील आपल्या मोठेपणाचे सारे श्रेय आपल्या पत्नी रमाई यांनाच दिले आहे. "पाकिस्तान आणि भारताचे विभाजन" हा मौलिक ग्रंथ लिहून डॉ.बाबासाहेबांनी आपली सहचारिणी रमाईंना अर्पण केला आणि त्यात ते म्हणतात,
" जिच्या अंतरंगाचा चांगुलपणा, जिचा उमदा स्वभाव, जिचे स्वच्छ चारित्र्य, जिची सुखद सहानुभूती, माझ्याबरोबर दुःख भोगण्याची तत्परता आणि आमच्या मित्र-विरहित , काळजीच्या आणि गरजांच्या दिवसांत जिने मला अविरत साथ दिली, त्या 'रामू' च्या स्मृतीस गुणग्राहकतेची खुण म्हणून माझी कलाकृती मी अर्पण करतो !"
आज ७ फेब्रुवारी म्हणजे माता रमाईंचा जन्मदिवस... अश्या ह्या कोट्यावधी पददलितांच्या मातोश्री रमाई आज देहाने आपल्यातून निघून गेल्या असल्या ,तरी त्यांनी आजीवन अनुभवलेल्या सुख-दुःखाच्या नानाविध घटनांच्या पावन स्मृतीतीस मात्र कायम मागे शिल्लक राहतील आणि त्यांची जीवन गाथा भावी पिढीला मार्गदर्शन करीत राहतील.. बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाआपल्या आयुष्याच्या अंतिम श्वासापर्यंत मेणबत्ती प्रमाणे क्षणोक्षणी जळून साथ देणाऱ्या त्यागमूर्ती माता रमाई यांच्या पवित्र स्मृतीस त्रिवार वंदन व कोटी कोटी प्रणाम ..
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक "स्त्री" असते असे म्हटले जाते आणि काही अंशी ते खरे ही आहे... अनेक यशस्वी पुरुषांच्या पाठीशी ढाल बनून त्यांची पत्नी उभी राहिल्यानेच यशस्वी व्यक्ती जीवनात काहीतरी करू शकल्या..
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत सगळ्यांनाच ठाऊक आहे. परंतु फक्त एक वेळचे जेवण घेऊन आणि शेणाच्या गोवर्या बनवून त्या विकून त्यातून आलेले पैसे बाबासाहेबांना लंडनला पाठवणार्या "रमाईंबद्दल" जास्त लोकांना माहिती नाही... त्या आई.. त्या स्त्री ला अभिवादन !!

2 comments :
कादंबरीकार दिनकर काकडे गेली अनेक वर्षे साहित्य क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या बद्दलची अधिक माहिती घेतली असता असे समजले की, ‘कादंबरीकार दिनकर काकडे यांची स्वतःचे काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होती आणि त्यासाठी त्यांनी एक कादंबरी लिहिण्याचे ठरवले. अनेक दिवस कथानकावर विचार करीत असतांनाच ते बाबासाहेब आंबेडकर यांची जीवनगाथा वाचत होतो. ती वाचतांना त्यांना जाणवले की ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांना घडविण्यासाठी जिजाऊंचा मोठा वाटा होता तेवढाच मोठा वाटा बाबासाहेबांना मोठे करण्यात त्यांच्या पत्नी रमाईचाही होता. त्याच बरोबर त्यांच्या वडिलांची डॉ. बाबासाहेब यांच्या बद्दल असलेली आस्था आणि आदर या मधून त्यांना रमाई बद्दल लिहिण्यास प्रेरणा मिळाली. त्यातूनच त्यांनी रमाबाईंच्या जीवनावरच कादंबरी लिहिण्याचे नक्की केले. पुढे त्यांनी चौकशी केली असता त्यांना असे कळले की अनेक मोठ्या लेखकांनी हे शिवधनुष्य पेलण्याची घोषणा केली होती. परंतु घोषणेच्या पुढे त्यांचे लिखाण सरकले नाही. परंतु लेखक दिनकर काकडे यानी ठरवले की आपण हे शिवधनुष्य पेलायचे. त्यांनी काही मित्रांना त्यांची योजना सांगितली, ती त्यांना खूपच आवडली. त्यानंतर सलग कित्येक महिने आणि वर्षे त्यांचे अभ्यासाचे व लिखाणाचे काम जराही घोषणाबाजी न करता काम सुरु होते. रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनावर जी काही लहान-मोठी पुस्तके होती ती सर्व त्यांनी आणली. ती वाचली, त्याचा सखोल अभ्यास करून आणि त्यातून महत्वाच्या घटना निवडून कादंबरी तयार केली... पुढे अनेक महिने व वर्षे ‘राष्ट्रमाता रमाई’ प्रसिद्ध होण्यासाठी अनेक प्रकाशक व संबंधित लोकांचे उंबरे झिजवले... हे सगळे लिहिण्याचे कारण की, एक वाचक म्हणून जे काही ज्ञान, आनंद व एक सर्वोत्तम ऐतिहासिक दस्तऐवज वाचल्याचे समाधान या चरित्रात्मक कादंबरीमधून आपल्याला कोणत्याही कष्टाशिवाय मिळाले... आणि इतरांनाही मिळणार आहे या सर्वांच्या पाठीमागे ज्येष्ठ साहित्यिक दिनकर काकडे यांची महान तपस्चर्या आहे... त्यांचा आपण सन्मान करावा... या कादंबरीबाबतचा आपला अभिप्राय त्यांना कळवावा... आणि शक्य झाल्यास त्यांच्या पुढील लिखाणास एक जाणकार वाचक व भारताचा एक जबाबदार नागरिक म्हणून त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करावे.
दिनकर काकडे जर कदाचित भारताबाहेर असते तर त्यांना खूप मोठी उंची मिळाली असती... आम्ही भारतीय अनेक वेळेस चांगल्या गोष्टीचे कौतुक करण्यात माणसांची पारख करण्यात कमी पडतो... लेखक दिनकर काकडे हा साहित्याच्या प्रांतातला एक दैदिप्यमान हिरा आहे आणि तो जास्तीत जास्त लोकांच्या निदर्शनात आणण्यासाठी एक वाचक म्हणून आम्ही निश्चितच हातभार लावला पाहिजे.
‘राष्ट्रमाता रमाई’ चे लिखाण करण्यासाठी त्यांच्या काही नातेवाईक आणि मित्रांनी खूपच मदत केली आहे. त्यांच्या मदतीविना ही कादंबरी पूर्णच होऊ शकला नसती. एखाद्या लेखकाला समाजातील लोकांनी मदत करणे ही खूप सकारात्मक बाब आहे. लेखक हा स्वतःसाठी कधीच लिहित नसतो. तर तो लिहितो केवळ समाजासाठी म्हणून समाजाने लेखकाला सांभाळले पाहिजे, टिकवले पाहिजे, जगवले पाहिजे... त्यांच्या गरजा पूर्ण करून त्यांना कायम लिहिते ठेवले पाहिजे...
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते असे म्हटले जाते आणि काही अंशी ते खरे ही आहे. अनेक यशस्वी पुरुषांच्या पाठीशी ढाल बनून त्यांची पत्नी उभी राहिल्यानेच अनेक यशस्वी व्यक्ती आपल्या जीवनात काहीतरी करू शकल्या. डॉ. आंबेडकरांबाबत सगळ्यांनाच ठाऊक आहे. परंतु फक्त एक वेळचे जेवण घेऊन आणि शेणाच्या गोवर्याय बनवून त्या विकून त्यातून आलेले पैसे बाबासाहेबांना लंडनला पाठवणार्याब रमाबाईंबद्दल जास्त लोकांना माहिती नाही.
रमाई यांची महती जगभरातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून ‘राष्ट्रमाता रमाई’ या चरित्रात्मक कादंबरीच्या माध्यमातून हा एक छोटासा प्रयत्न जयसिंगपूर येथील कवितासागर प्रकाशनाच्या माध्यमातून आणि तो सुद्धा यासाठी सरकार वा आंबेडकरवादी संघटनांकडून एक पैसाही न घेता मुद्रण व प्रकाशनाची संपूर्ण जबाबदारी डॉ. सुनील पाटील यांनी आपल्या खांद्यावर घेवून समाजाला त्यानी ‘राष्ट्रमाता रमाई’ हा एक ऐतिहासिक ठेवा छापील स्वरुपात बहाल केला त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन...
‘राष्ट्रमाता रमाई’ कादंबरीच्या निर्मितीमध्ये सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेतील बाळासाहेब कांबळे यांची भूमिका अत्यंत महत्वाची होती त्याबद्दल त्यांचेही आभार आणि धन्यवाद.
- राज धुदाट (लेखक - कवी - संपादक - अनुवादक)
02322 221891, 8485877232, 9730310683
Supab
Post a Comment