Tuesday, February 18, 2014

रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महराज यांच्या जयंती

 


रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महराज यांच्या जयंतीच्या सर्व बांधवांना 
खुप खुप हार्दिक शुभेच्छा....!

राजे शिवाजी अनेक लढाया लढले, शिवाजी महाराजांनी अनेक मोहीमा फत्ते केल्या. महाराजांनी लढाईस निघण्यापूर्वी अथवा मोहीमेवर जाण्यापूर्वी किल्ल्यावर सत्यनारायणाची पूजा घातली असा कुठे उल्लेख सापडत नाही. महाराजांनी ज्योतीष, भविष्य, ग्रह-तारे यांची स्थीती, शुभ वेळ-काळ असल्या भंपक गोष्टींवर जराही विश्वास ठेवला नाही. स्वराज्य ऊभारले ते स्वतःच्या इच्छाशक्तीवर, मनगटातल्या जोरावर आणि प्राणाला प्राण देणाऱ्या मर्द मावळ्यांच्या सोबतीनेच. शिवरायांचा धगधगता इतिहास प्रेरणादायक असताना त्यांच्या जयंतीदिनी जे प्रकार चालतात ते पहाता यांना शिवाजी महाराज समजलेच नाहीत असे म्हणावे वाटते. 
ज्या ब्राम्हणांनी राजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला त्यांच्याच वंशजांकडून शिवजयंतीदिनी सत्यणारायणाची पूजा घालणारे नतद्रष्ट राजांचा अपमान करत असतात.
राजांच्या जन्मतिथीचा वाद ही असाच निर्माण करण्यात आलाय. खरे शिवप्रेमी असाल तर शिवाजी महाराजांना असे धर्म-कर्मकांडात बांधून ठेवू नका. शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांचा महान पराक्रम लोकांपर्यंत पोहचवा. 
रयतेच्या राजाची जयंती सर्व रयतेने कोणताही भेद-भाव ठेवता साजरी करावी.

No comments :