Tuesday, June 17, 2014

रिजर्व बँक ऑफ इंडिया आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान

"वाचाल तर विचार कराल विचार कराल तर वाचाल''
रिजर्व बँक ऑफ इंडिया आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान ... डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे रिजर्व बँकेच्या स्थापनेत संकल्पनेत महत्वपूर्ण योगदान आहे हे एव्हाना फेसबुक वरील काही पोस्टींग वरून सर्वाना माहित झाले आहेच, परंतु नक्की काय योगदान हे सखोल माहित असणे आवश्यक आहे. रिजर्व बँक हि एक केंद्रीय बँकिंग संस्था आहे जी भारतीय चलन विषयक नियमावली आणि आर्थिकनीती वर नियंत्रण ठेवते तसेच भारत सरकारच्या उन्नती आणि विकास कामाच्या योजना ठरवते. भारतीय वित्त व्यवस्थेवर नियंत्रण तसेच महत्वाचे निर्णय घेते. रिजर्व बँक १ एप्रिल १९३५ साली ब्रिटीश राजवटीत स्थापन झालेल्या रिजर्व बँक ऑफ इंडिया च्या संकल्पनेत बासाहेबांच्या पुस्तकावरआधारित असलेल्या हिल्टन कमिशनच्या रिपोर्ट चा आधार घेण्यात आला; रिजर्व बँक ऑफ इंडिया हि संपूर्णपणे डॉ बाबासाहेबांच्या विचारावर, आणि त्यांनी आखून दिलेल्या रूपरेषा आणि संकल्पनेवर सुरळीतपणे अव्याहत सुरु आहे. आधी आपण बाबासाहेबांचा अर्थशास्त्र आणि भारतीय अर्थ व्यवस्थेवरील अभ्यास जाणून घेऊ... सन १९१५ साली "प्राचीन भारतीय अर्थनीती" (Ancient Indian Commerce) या प्रबंधासाठी बाबासाहेबांना मास्टर ऑफ आर्ट्स हि पदवी मिळाली, त्यानंतर १९१६ साली त्यांनी " भारताचा राष्ट्रीय लाभांश " (National Divident of India) हा प्रबंध कोलंबिया द्यापीठात सदर केला जो ८ वर्षांनी पी. एस. किंग अंड सन्स या कंपनी ने "ब्रिटीश भारतातील प्रांतीय आर्थिक विकास" (the evolution of provincial finance in british india ) म्हणून प्रसिद्ध केला, बाबासाहेबांनी या विस्तृत ग्रंथाच्या आवश्यक तितक्या प्रती कोलंबिया विद्यापीठाला सादर केल्या. विद्यापीठाने अधिकृत पणे doctor of philosophy हा किताब बहाल केला. सन १९२३ च्या एप्रिल महिन्यात बाबासाहेबांचा अतिशय महत्वाचा आणि ऐतिहासिक प्रबंध " भारतीय चलनाच्या समस्या " ( the problem the rupee) पूर्ण झाला आणि त्यांनी तो कोलंबिया विद्यापीठात पाठवला आणि ते मान्य होऊन बाबासाहेबांना डॉक्टर ऑफ सायन्स (DSc) हि पदवी बहाल करण्यात आली डॉ. बाबासाहेबांचे खोल ज्ञान आणि विषय मांडण्याची पद्धत आणि मुद्देसूद लिखाणावर टाईम्स लंडन आणि इकोनोमिक्स या वृत्तपत्रांनी भरभरून कौतुक केले होते. भारतीय अर्थ व्यवस्थेचा सखोल अभ्यास, विश्लेषणात्मक आणि मुद्देसूद मांडणी, अभ्यासपूर्ण उपाय योजना, आर्थिक विकासासाठी असलेली दूर दृष्टी बाबासाहेबांच्या या तीनही प्रबंधातून सबंध जगाला दिसून आली. भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास आणि सुधारणा करण्यासाठी १९२४ - २५ मध्ये ब्रिटीश सरकारने "रोयल समिती" नेमली होती,त्यालाच Hilton Young Commission असेही म्हणतात;या समिती कडून बाबासाहेबांना भारतीय अर्थव्यवस्थेवर बोलण्यास आमंत्रण आले,या समिती मधील प्रत्येक सदस्याच्या हातात "THE PROBLEM OF THE RUPEE" हे बाबासाहेबांनी लिहिलेलं पुस्तक होतं बाबासाहेबांना आपला प्रबंध प्रत्येकजन संदर्भ म्हणून घेत आहेत हे पाहून आनंद झाला बाबासाहेबांनी या समिती समोर भारतीय अर्थव्यवस्था कशी असावी, भारतीय चलनात असलेल्या अडचणी आणि त्यावरील उपाय योजना, बँकिंग कार्यपद्धती कशी असावी, मुद्रा कोणाच्या अधिपत्याखाली असतील, वित्तीय धोरण कसे राबवावे,चलनाचा मानदंड काय असावा. संस्थान खालसा, सामुहिक शेती व्यवसाय आणि आर्थिक धोरण, जमीन कर, जमीनदारी पद्धती आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम,सोने हे मापदंड मानून चलन व्यवस्थे चे फायदे आणि तोटे मागील ४ दशकांचा आर्थिक आणि राजकीय आढावा, नाणे बंदी केल्याने होणारे फायदे,महागाई आणि चलन समस्या आणि निराकरण या आणि अशा अनेक वित्तीय, आर्थिक धोरणांचा, उपाय योजनांचा सुस्पष्ट आणि सोप्या पद्धतीत मांडणी केली आहे ज्या दीर्घ काळापर्यंत बँक व्यावसायिक,अर्थशास्त्र विद्यार्थी आणि अभ्यासक यांना मार्गदर्शक ठरणाऱ्या आहेत. Read "Statement of Evidence to the royal Commission On Indian Currency" १९३५ साली पहिल्या महायुद्धानंतर ब्रिटीश राजवटीतील भारतीय अर्थ व्यवस्था सुरळीत राहावी म्हणून रिजर्व बँक ऑफ इंडिया स्थापन करण्याचे ठरले, जी भारतातील इतर वित्तीय संस्था आणी बँकांवर अंकुश ठेवून कारभार सुरळीत चालू राहील. रिजर्व बँक १९२५ साली भारतात नेमलेल्या रोयल कमिशन म्हणजेच हिल्टन कमिशन च्या रिपोर्ट आणि तपशिला वरून बनवण्यात आली. बाबासाहेबांनी लिहिलेल्या तीनही आर्थिक ग्रंथांचा उपयोग करून तसेच त्यांच्या संकल्पना आणि कामकाजाची पद्धत रिजर्व बँकेच्या स्थापनेचा पाया ठरला. १९४९ साली रिजर्व बँक हि अधिकृत आणि संपूर्णपणे भारत सरकारच्या अंमलाखाली आली १९३५ मध्ये जेव्हा रिजर्व बँकेची स्थापना झाली तेव्हा बाबासाहेब सक्रिय राजकारणात सहभागी होते, मोर्चे,आंदोलने पक्ष बांधणी अशी धावपळ सुरु होती ; याच वर्षी बाबासाहेब विधी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून नियुक्त झाले याच वर्षी रमाई बाबासाहेबांना सोडून गेली; याच वर्षी बाबासाहेबांनी येवला नाशिक इथे मोठी सभा घेतली आणि मी हिंदू म्हणून मारणार नाही अशी प्रतिज्ञा घेतली आणि याच वर्षी बाबासाहेबांचा दस्तावेज / ग्रंथ मात्र रिजर्व बँकेचा पाया रचण्यासाठी वापरले जात होते. इतर देशात अर्थ व्यवस्था ढासळत ढासळत असताना सुद्धा बाबासाहेबांनी सुचवलेले मार्गदर्शक तत्वे आणि कार्यप्रणाली वर आज सुद्धा भारतीय रिजर्व बँक आणि भारतीय अर्थव्यवस्था डौलाने डौलाने उभी आहे. भारतीय रिजर्व बँक च्या स्थापनेत जरी बाबासाहेब नसले तरी संकल्पना आणि रूपरेषा बाबासाहेबांनी दिलेली आहे हे विकिपीडिया या सोशल साईट ने दिले आहे परंतु बँकेच्या अधिकृत वेब साईट वर हि माहिती कुठेही नाही हि शोकांतिका आहे.
जय भीम ! जय भारत !!

Monday, June 2, 2014

शिवाजी महाराज जर मुसलमानांचे विरोधक असते तर …



शिवाजी महाराज जर मुसलमानांचे विरोधक असते
तर …
शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख
कोण
होता ?…. इब्राहीम खान
…. ,शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख
कोण
होता ?…दौलत खान
…,शिवाजी महाराजांच्या घोड-
दलाचा प्रमुख कोण होता ?…. सिद्दी हिलाल
…,शिवाजी महाराजांचा पहिला सर-
सेनापती कोण होता ?
…. नूर खान ,…. शिवाजी महाराजांबरोबर
आग्र्याला गेलेला … मदारी मेहतर…. मुसलमान …।
शिवाजी महाराजांचा एकमेव वकील ….
काझी हैदर
हा हि मुसलमान …। शिवाजी महाराजांचे एकमेव
चित्र
उपलब्ध आहे त्या चित्रकाराचे नाव मीर मोहम्मद
हा हि मुसलमान ……
आणि शिवाजी महाराजांना अफझल
खानाचा वध करण्यासाठी वाघ नख्या पाठवून
देणारा…
रुस्तुमे जमाल हा हि मुसलमान…। एवढे जर मुसलमान
अधिकारी शिवाजी महाराजांच्या सैन्यात असू
शकतात तर
शिवाजी महाराज मुसलमानाचे विरोधक असू
शकतात
काय ?…। शिवाजी महाराजांचे 3 1 बॉडी गार्ड
होते
त्या पैकी 1 0 मुसलमान होते … आणि बॉडी गार्ड
काय करू
शकतो हे इंदिरा गांधी ला जाऊन विचारा ….
शिवाजी महाराजांनी एक हि मस्जिद
पाडली नाही । एक
हि कुराण जाळले नाही ….
याचा गांभीर्याने विचार या देशात
झाला पाहिजे ….
रायगड किल्ला राजधानी बांधल्या नंतर तेथे
जगदीश्वराचे
मंदिर बांधले …महाराजांनी मंत्र्याला विचारले
जगदीश्वराचे
मंदिर बांधले पण माज्या मुसलमान
सैनिकासाठी मस्जिद कुठे
आहे ?… मंत्र्याने विचारले महाराज
जागा दाखवा ….
महराजांनी आपल्या राजवाड्यासमोरील
जागा दाखवली आणि तेथे आपल्या मुसलमान
सैनिकासाठी मस्जिद बांधून घेतली … हा इतिहास
आपल्या देशात का सांगितला जात नाही ?….
हा इतिहास
जर समाजापुढे गेला तर या देशात सामाजिक
दुरी निश्चित
नाहीशी होईल ….
अफझल खानाला मारल्यानंतर
शिवाजी महाराज प्रतापगडावर गेले ……
जिजाऊनि विचारले
अफझल खानाचे काय झाले ? महाराज उत्तरले
मासाहेब
अफझल खान मारला गेला …. त्याचं प्रेत कुठ आहे ?
….
प्रतापगडाच्या पायथ्याशी …. काय
म्हणाल्या जिजाऊ ?
…. शिवबा अफझल खान जिवंत असे पर्यंत
त्याच्याशी वैर
होते अफझल खान संपला(मेला ) आता वैर हि संपले
…. अन
तुज्या राज्यात कोण्या प्रेताला कोल्हया-कुत्र्य
ाने
तोडावे हे शोभणार नाही …. त्याच्या प्रेताचे
सन्मानाने
दफन कर …आणि तुज्या विजयाचे प्रतिक म्हणून तेथे
स्मारक
बांध …। . शिवाजी महाराजांनी अफझल
खानच्या प्रेताचे
प्रतापगडाच्या पायथ्याशी दफन केले व तेथे
त्याची कबर
बांधली …. शिवाजी महाराजांनी ती कबर
बांधली …
जय शिवाजी ..16 व्या शतकात शिवनेरीवर एक
तारा चमकला ...
जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला,
पुढे हाच सिंह रयतेचा वाली झाला ,
ज्याच्या हातुन महाराष्ट्र घङला .

Wednesday, May 7, 2014

यशाचा पासवर्ड !!!





यशाचा पासवर्ड !!!
राजर्षी शाहू महाराजांकडे एक ज्योतिषी आला. मी साऱ्या विद्या जाणतो. मी आपलं अचूक भविष्य सांगतो. असं तो राजर्षींना सांगू लागला. त्याला थांबवत राजर्षी म्हणाले, माझं भविष्य नंतर बघू. आपण जर एवढे भविष्यज्ञानी आहात, तर मला तुमचंच आजचं भविष्य सांगा ?

तसा तो ज्योतिषी म्हणाला, 'महाराज, आज माझा दिवस अत्यंत शुभ आहे. मान-मरातब-सन्मान मिळण्याचा आज मला योग आहे. अत्यंत आनंदी असा माझ्यासाठी हा आजचा सर्वोत्तम दिवस आहे !

एवढ ऐकल नि राजर्षि कडाडले, या ज्योतिषाला ताबडतोब इथंच चाबकाचे पन्नास फटके मारा !

ज्योतिषी गयावया करत राहिला, पण त्याला चाबकाचे पन्नास फटके पडले आणि मग राजर्षी म्हणाले, "ज्योतिषीबुवा आज तुमच्यासाठी मान-मरातब-सन्मानाचा शुभ दिवस होता. मग ? तुमचं भविष्य खोट कसं ठरलं ?" ज्योतिषी फक्त मान खाली घालून चुळबुळत राहिला, राजर्षी म्हणाले, "ज्याला स्वतःच पुढच्या क्षणाच भविष्य माहिती नाही, तो इतरांच्या आयुष्याचं भविष्य काय सांगणार ? इतरांचं नशीब घडवणारे तुम्ही तुमचं नशीब घडवायचं सोडून दारोदार असे दक्षिणेच्या गिन्न्या गोळा करत हिंडला नसता !"

लक्षात ठेवा, भविष्य तळहातांवरच्या रेषांवर नाही. मनगटाच्या पराक्रमावरच घडवता येत. नशिबावर हवाला ठेवण्यापेक्षा स्वतःवर भरोसा ठेवा. कर्तुत्वावर विश्वास ठेवा. यश मिळेलच !

Wednesday, April 16, 2014

Congress is more dangerous than BJP

In this interview You will get focus on below point. 1. Action and Reaction? 2. Congress is more dangerous than BJP 3. Who and Why doing Bomb blast in india? 4. what is "Andolan" how it's run?

Reservation and OBC

Thursday, April 3, 2014

भारत सरकार ने शिक्षा का अधिकार दिया नहीं। सुप्रीम कोर्ट ने अधिकार दिया था उसे भारत सरकार ने छीन लिया।

भारत सरकार ने शिक्षा का अधिकार दिया ऐसा प्रचार करना और परीक्षा लेनेसे मना करना इसका मतलब है भारत सरकार ने शिक्षा का अधिकार दिया नहीं। सुप्रीम कोर्ट ने अधिकार दिया था उसे भारत सरकार ने छीन लिया।

waman meshram - dhurt lala kejriwal