Sunday, February 9, 2014

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबऱ्या-

प्रकाशक –  

१) विद्यार्थिगृह प्रकाशन, पुणे 

२) चंद्रकांत शेट्ये, कोल्हापूर-२.  


१  आग
२  आघात
३  अहंकार
४  अग्निदिव्य
५  कुरूप
६  चित्रा
७  फुलपाखरू
८  वारणेच्या खोऱ्यात
९  रत्ना
१०  रानबोका
११  रुपा
१२  संघर्ष
१३  तास
१४  गुलाम
१५  डोळे मोडीत राधा चाले
१६  ठासलेल्या बंदुका
१७  जिवंत काडतूस
१८  चंदन
१९  मूर्ती
२०  मंगला
२१  मथुरा
२२  मास्तर
२३  चिखलातील कमळ
२४  अलगुज
२५  रानगंगा
२६  माकाडीचा माळ
२७  कवड्याचे कणीस
२८  वैयजंता
२९  धुंद रानफुलांचा
३०  आवडी
३१  वारणेचा वाघ
३२   फकिरा
३३  वैर
३४  पाझर
३५  सरसोबत

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबरी वरून निघालेले चित्रपट-

१ वैजयंता ‘ या कादंबरी वरून निघालेला चित्रपट   ‘ वैजयंता ‘   साल - १९६१    कंपनी - रेखा फिल्म्स

२ ‘ आवडी’ या कादंबरी वरून निघालेला चित्रपट  ‘टिळा लावते मी रक्ताचा’ साल –१९६९  कंपनी-चित्र ज्योत

३ ‘माकडीचा माळ’ या कादंबरी वरून निघालेला चित्रपट  ‘डोंगरची मेना’ साल - १९६९  कंपनी - विलास चित्र

४ ‘चिखलातील कमळ’ या कादंबरी वरून निघालेला चित्रपट ‘मुरली मल्हारी रायाची’ साल-१९६९ कंपनी -रसिक चित्र

५ ’वारणेचा वाघ’ या कादंबरी वरून निघालेला चित्रपट  ‘वारणेचा वाघ’ साल - १९७० कंपनी -  नवदिप चित्र

६ ’ अलगूज’ या कादंबरी वरून निघालेला चित्रपट  ‘अशी ही सातार्याची तर्हा’ साल - १९७४ कंपनी - श्रीपाद चित्र

७ ’ फकिरा’ या कादंबरी वरून निघालेला चित्रपट   ‘फकिरा’   कंपनी – चित्रनिकेतन

 

अण्णाभाऊ साठे याची लोकप्रिय गीतरचना....

माझी मैना गावावर राहिली |
माझ्या जिवाची होतिया काहिली ||

ओतीव बांधा | रंग गव्हाला | 

कोर चंद्राची | उदात्त गुणांची |
मोठ्या मनाची | सीता ती माझी रामाची |

हसून बोलायची | मंद चालायची | 
सुगंध केतकी | सतेज कांती |
घडीव पुतली सोन्याची | नव्या नवतीची | 
काडी दवन्याची |रेखीव भुवया | 
कमान जणू इन्द्रधनुची | हिरकणी हिरयाची

काठी आंधल्याची | तशी ती माझी गरीबाची|
मैना रत्नाची खाण | माझा जिव की प्राण |
नसे सुखाला वाण | 
तिच्या गुणांची छक्कड़ मी गयिली |
माझ्या जिवाची होतिया काहिली ||


गरिबीने ताटतुट केलि आम्हा दोघांची | 
झाली तयारी माझी मुम्बैला जाण्याची |
वेळ होती ती भल्या पहाटेची | 
बांधाबांध झाली भाकर तुकड्याची | 
घालवित निघाली मला
माझी मैना चांदनी शुक्राची | 
गावदरिला येताच कली कोमेजली  तिच्या मनाची |
शिकस्त केलि मी तिला हसवण्याची | 
खैरात केली पत्रांची | वचनांची | 
दागिन्यांन मडवुन काडयाची |
बोली केली शिंदेशाही तोड्याची | 
साज कोल्हापुरी | वज्रटिक |  
गल्यात माळ पुतल्याची | 
कानात गोखरे | पायात मासोल्या | 
दंडात इला आणि नाकात नथ सर्जाची | 
परी उमलली नाही कली तिच्या आन्तरिची | 
आणि छातीवर दगड ठेवून पाठ धरिली मी मुम्बैची |
मैना खचली  मनात | ती हो रुसली डोळ्यात |
नाही हसली गालात | हात उन्चावुनी उभी राहिली ||
माझ्या जिवाची होतिया काहिली ||
या मुम्बई गर्दी बेकरांची | 
त्यात भर झाली माझी एकाची | 
मढ़ेवर पडावी मुठभर माती | 
तशी गत झाली आमची |
ही मुम्बई यंत्राची, तंत्राची, जागनाराची, मरनारांची, शेंदिची, दाढ़ीची,
हडसनच्या गाडीची, नायलोनच्या आणि जोर्जेटच्या तलम साडीची | बुटांच्या जोडीची |
पुस्तकांच्या थडीची | माडीवर माडी | हिरव्या माडीची | 
पैदास इथे भलतीच चोरांची |
एतखाऊची | शिर्जोरांची | 
हरामखोरांची | भांडवलदाराची |
पोटासाठी पाठ धरली होती मी कामाची |
 पर्वा केलि नाही उन्हाची, थंडीची, पावसाची |
पाण्यान भरल खीस माझ | 
वान माला एका छात्रिची | 
त्याच दरम्यान उठली चलवल
संयुक्त महाराष्ट्राची | 
बेलगांव, कारवार, निपानी, गोव्यासह एकभाषिक राज्याची |
चकाकली संगीन अन्यायाची | फ़ौज उठली बिनिवारची | 
कामगारांची | शेतकरीयांची |
मध्यमवर्गियांची |
उठला मराठी देश | आला मैदानी त्वेष | 
वैरी करण्या नामशेष |
गोळी डमडमची छातीवर सहिली |
माझ्या जिवाची होतिया काहिली ||
म्हणे अन्नाभाऊ साठे | घर बुडाली गर्वाची | मी-तू पणाची | जुल्माची | जबरिची |
तस्कराची | निकुम्बलीला कत्तल झाली इन्द्रजिताची |
चौदा चौकड्याच राज्य गेले रावनाचे | लंका जलाली त्याची | तीच गत झाली कलियुगामाजी
मोरारजी देसायाची आणि स.का. पाटलाची | अखेर झाली ही मुम्बई महाराष्ट्राची |
परलच्या प्रल्याची | लालबागच्या लढायची | फौंटनच्या चढ़ाइची |
झाल फौंटनला जंग | तिथे बांधुनी चंग |
आला मर्दानी रंग | धार रक्ताची मर्दानी वाहिली ||
माझ्या जिवाची होतिया काहिली ||
महाराष्ट्राने गुढी उभारली विजयाची | दाखविली रित पाठ भिंतीला लावून लढायची |
पारी तगमग थांबली नाही माझ्या अंतरीची | गावाकडे मैना माझी | भेट नाही तिची |
तीच गत झाली आहे या खंडित महाराष्ट्राची | बेलगांव, कारवार, डांग, उम्बरगावावर
मालकी दुजांची | धोंड खंडनीची | कमाल दंडलीची | चिड बेकिची | गरज एकीची |
म्हणून विनवणी आहे या शिवशाक्तिला शाहिराची |
आता वलु नका | रणी पलु नका | कुणी चलू नका |
बिनी मारायची अजुन राहिली | माझ्या जिवाची होतिया काहिली ||

चार आर्य सत्य & आर्य अष्टांग मार्ग


चार आर्य सत्य

. दुःख : इस दुनिया में सब कुछ दुःख है जन्म में, बूढे होने में, बीमारी में, मौत में, प्रियतम से दूर होने में, नापसंद चीज़ों के साथ में, चाहत को पाने में, सब में दुःख है
. दुःख प्रारंभ : तृष्णा, या चाहत, दुःख का कारण है और फ़िर से सशरीर करके संसार को जारी रखती है
. दुःख निरोध : तृष्णा से मुक्ति पाई जा सकती है
. दुःख निरोध का मार्ग : तृष्णा से मुक्ति आर्य अष्टांग मार्ग के अनुसार जीने से पाई जा सकती है

बुद्ध का पहिले धर्मोपदेश, जो उन्होने अपने साथ के कुछ साधुओं को दिया था, इन चार आर्य सत्यों के बारे में था

आर्य अष्टांग मार्ग

बौद्ध धर्म के अनुसार, चौथे आर्य स्त्य का आर्य अष्टाण्ग मार्ग है दुःख निरोध पाने का रास्ता गौतम बुद्ध कहते थे कि चार आर्य सत्य की सत्यता का निश्चय करने के लिए इस मार्ग का अनुसरण करना चाहिए

सम्यक दृष्टि : चार आर्य सत्य में विश्वास करना
सम्यक संकल्प : मानसिक और नैतिक विकास की प्रतिज्ञा करना
सम्यक वाक : हानिकारक बातें और झूट बोलना
सम्यक कर्म : हानिकारक कर्में करना
सम्यक जीविका : कोई भी स्पष्टतः या अस्पष्टतः हानिकारक व्यापार करना
सम्यक प्रयास : अपने आप सुधारने की कोशिश करना
सम्यक स्मृति : स्पष्ट ज्ञान से देखने की मानसिक योग्यता पाने की कोशिश करना
सम्यक समाधि : निर्वाण पाना और स्वयं का गायब होना

कुछ लोग आर्य अष्टांग मार्ग को पथ की तरह समझते है, जिसमें आगे बढ़ने के लिए, पिछले के स्तर को पाना आवश्यक है और लोगों को लगता है कि इस मार्ग के स्तर सब साथ-साथ पाए जाते है मार्ग को तीन हिस्सों में वर्गीकृत किया जाता है : प्रज्ञा, शीला, और समाधि


पोतराज : Great Speech

Friday, February 7, 2014

रमाबाई हि माता “रमाई” कशी झाली.... माता रमाबाई आंबेडकर यांना “रमाई” हे नाव कसे पडले !!

सगळ्यांनी वाचा आपली रमाबाई हि माता “रमाई” कशी झाली.... माता रमाबाई आंबेडकर यांना “रमाई” हे नाव कसे पडले !!

एकदा बाबासाहेब आणि रमाई दादर च्या राजगृह बंगल्यावर राहत होते.त्यावेळी एकदा अचानक बाबासाहेबांना परदेशी काही कामा निमित्त जायचे होते पण रमाई ला एकटी घरामध्ये कसे राहायला ठेवायचे म्हणून बाबासाहेब धारवाड च्या त्यांच्या वराळे मित्राकडे रमाई ला पाठवतात व काही दिवस तिकडेच राहायला सांगितले. ते वराळे काका धारवाड मध्ये लहान मुलांचे वस्ती गृह चालवत असत.त्या वस्ती गृहाच्या आवारात अनेक लहान मुले खेळायला येत असत.एकदा अचानक दोन दिवस ते लहान मुले खेळायलाच आली नाही. म्हणून रमाई वराळे काका यांना विचारते दोन दिवस झाली हि मुले कुठे गेली आहेत खेळायला आवारात का आली नाही. त्यावेळी वैराळे म्हणतात कि हि लहान मुले दोन दिवसा पासून उपाशी आहेत तर हि खेळायला कशी येतील. रमाई त्यांना विचारते हि मुले का उपाशी आहेत तर ते रमाईला बोलतात कि वसतिगृहाला जे अन्न धान्याच ग्र्यांड महिन्याला भेटत असायचं ते अजून मिळालेलं नाही ते मिळायला अजून तीन दिवस लागतील.अजून तीन दिवस हि मुले उपाशी च राहणार आहेत. 

वराळे अगदी कंठ दाटून ते बोलतात. त्यावेळी रमाई लगेच आपल्या खोली मध्ये जाते आणि रडत बसते आणि कपाटातला सोन ठेवलेला डबा आणि आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून वराळे यांच्याकडे देते आणि म्हणते तुम्ही ह्या बांगड्या आणि डबा ताबडतोब विकून किंवा गहान ठेवून ह्या आणि लहान मुलांसाठी खाण्याच्या वस्तू घेवून या. मी अजून तीन दिवस हि लहान मुले उपाशी नाही पाहू शकत. त्यावेळी वराळे त्या बांगड्या आणि डबा घेवून जातात आणि लहान मुलांसाठी जेवणाच्या वस्तू घेवून येतात आणि लहान मुले त्यावेळी पोटभरून जेवण करतात. खुप आनंदी राहतात. हे पाहून रमाई खूप आनंदी होते.तिचा आनंद गगनात मावत नव्हता.मग त्यावेळी हि सगळी लहान मुले रमाबाई यांना रमाआई म्हणून बोलायला लागतात.आणि त्या क्षणा पासून रमाबाई हि माता रमाई झाली.आणि ती आपल्या सगळ्यांची आई झाली.

म्हणून ख्यातनाम गायक "मिलिंद शिंदे" बोलतात कि...

भुकेल्या मुलांची दशा पाहुनी,
भुकेल्या मुलांची दशा पाहुनी,
बांगड्या... सोन्याच्या रमान दिल्या काढुनी.
धन्य रमाई | धन्य रमाई ||

(धन्यवाद- सचिन सोरटे)

थोर पुरुषाची पत्नी होणे हे जसे महान कार्य, तशीच एक मोठी जबाबदारीही असते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणेज विसाव्या शतकातील एक महापुरुष. रमाईंनी बाबासाहेबांच्या ध्येयपथातील काट्यांची झाडलोट करून त्यांचा ध्येयवाद खडतर मार्ग अधिक सुगम बनविला. पतीच्या स्वीकृत कष्टमय जीवनात त्यांनी प्रामाणिकपाने साथ दिली. आपल्या कौटुंबिक सुखासाठी त्यांनी बाबासाहेबांकडून कसलीहीअपेक्षा केली नाही. उलट बाबासाहेबांच्या प्रत्येक लहान-मोठया कार्यात त्यांना यथाशक्तीप्रोत्साहित करून व स्फूर्ती देऊन त्यांच्या मागे सावलीसारख्या सतत उभ्या राहिल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना देखीलआपली पत्नी रमाईच्या कष्टमय जीवनाची जाणीव होती. रमाई सारखी सहचारिणी लाभली म्हणूनच आपण परदेशात जाऊन वर्षानुवर्षे उच्च शिक्षण घेऊ शकलो व अस्पृश्योद्धारा च्या सामाजिक कार्यात पूर्णपणे समरस होऊ शकलो, ही गोष्ट किंवा वस्तुस्थिती ते कधीही अमान्य करीत नसत. 

पतीनिष्ठ रमाईचे उदाहरण दृष्टीसमोर ठेवून बाबासाहेब जाहीरपणे सांगत असत की, स्त्री हासमाजाचा अलंकार आहे. आपल्या कुटुंबाच्या अन कुळाचा नावलौकिक स्त्रियांच्या शिलावरच अवलंबून असतो. स्त्री ही जशी गृहिणी तशीच सुसंस्कारित समाज निर्माण करणारी माता आहे. परंतु वैवाहिक जीवनाच्या प्रारंभीच्या काळात त्यांच्यावरउपासमार, हालपेष्ट, दुःख, दारिद्र्य व चिंता यांचे जे प्रसंग ओढवले त्यामुळे त्यांच्या शरीर-प्रकृतीवर जो परिणाम तो कायमचाच त्या नेहमी आजारी असायच्या आणि एकदा त्या अंथरुणाला खिळल्या त्या कायामच्याच २७ मे १९३५ ला त्यांनी हळूच डोळे उघडले. आपल्याजवळ बाबासाहेबांना पाहून त्यांना मानसिक समाधान झाले. बाबासाहेबांकडे एकटक पाहूनत्यांनि क्षीण हास्य केले. आणि पतीचे रूप ती साध्वी आपल्या हृदयात नेहमीकरिता जणू साठवून ठेवीत होती.

बाबासाहेबांनी देखील आपल्या मोठेपणाचे सारे श्रेय आपल्या पत्नी रमाई यांनाच दिले आहे. "पाकिस्तान आणि भारताचे विभाजन" हा मौलिक ग्रंथ लिहून डॉ.बाबासाहेबांनी आपली सहचारिणी रमाईंना अर्पण केला आणि त्यात ते म्हणतात,

" जिच्या अंतरंगाचा चांगुलपणा, जिचा उमदा स्वभाव, जिचे स्वच्छ चारित्र्य, जिची सुखद सहानुभूती, माझ्याबरोबर दुःख भोगण्याची तत्परता आणि आमच्या मित्र-विरहित , काळजीच्या आणि गरजांच्या दिवसांत जिने मला अविरत साथ दिली, त्या 'रामू' च्या स्मृतीस गुणग्राहकतेची खुण म्हणून माझी कलाकृती मी अर्पण करतो !"

आज ७ फेब्रुवारी म्हणजे माता रमाईंचा जन्मदिवस... अश्या ह्या कोट्यावधी पददलितांच्या मातोश्री रमाई आज देहाने आपल्यातून निघून गेल्या असल्या ,तरी त्यांनी आजीवन अनुभवलेल्या सुख-दुःखाच्या नानाविध घटनांच्या पावन स्मृतीतीस मात्र कायम मागे शिल्लक राहतील आणि त्यांची जीवन गाथा भावी पिढीला मार्गदर्शन करीत राहतील.. बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाआपल्या आयुष्याच्या अंतिम श्वासापर्यंत मेणबत्ती प्रमाणे क्षणोक्षणी जळून साथ देणाऱ्या त्यागमूर्ती माता रमाई यांच्या पवित्र स्मृतीस त्रिवार वंदन व कोटी कोटी प्रणाम ..

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक "स्त्री" असते असे म्हटले जाते आणि काही अंशी ते खरे ही आहे... अनेक यशस्वी पुरुषांच्या पाठीशी ढाल बनून त्यांची पत्नी उभी राहिल्यानेच यशस्वी व्यक्ती जीवनात काहीतरी करू शकल्या..

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत सगळ्यांनाच ठाऊक आहे. परंतु फक्त एक वेळचे जेवण घेऊन आणि शेणाच्या गोवर्‍या बनवून त्या विकून त्यातून आलेले पैसे बाबासाहेबांना लंडनला पाठवणार्‍या "रमाईंबद्दल" जास्त लोकांना माहिती नाही... त्या आई.. त्या स्त्री ला अभिवादन !!

Thursday, February 6, 2014